पंढरपूर | गुजरातमध्ये भाजपच्या आमदाराने राष्ट्रवादीच्या एका महिला कार्यकर्तीला शिवीगाळ करून मारहाण केल्याचा प्रकार काही दिवसांपूर्वी समोर आला होता. याच्या निषेधार्थ भाजपचे आमदार राम कदम यांना राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या रोषाला सामोरं जावं लागलं आहे.
भाजपचे आमदार महिलांचा वारंवार अवमान करत असल्याच्या निषेधार्थ राम कदम यांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिलांनी साडीचोळी आणि बांगड्यांचा आहेर दिला आहे.
पंढरपूरात विठ्ठल रूक्मिणी मंदिर समितीची बैठक होती. या बैठकीला राम कदम आले असता भक्त निवासात हा प्रकार घडला आहे. यावेळी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी राम कदम हाय हाय… भाजप सरकार हाय हाय… अशा घोषणा दिल्या.
राष्ट्रवादीच्या महिलांनी राम कदमांना राखी बांधण्याचा प्रयत्न करत आम्ही तुम्हाला राखी बांधतो कारण त्या राखीमुळे तरी तुम्ही आम्हाला मारणार नाही, असं म्हटलं.
महत्वाच्या बातम्या
-विखेंचा भाजपप्रवेश मुख्यमंत्र्यांनी ठेवला वेटिंगवरच; म्हणतात…
-अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष म्हणतात, भारतातील हवा आणि पाणी चांगलं नाही…
-RSS च्या लोकांसारखी चिकाटी हवी; त्यांच्याकडून काहीतरी शिका- शरद पवार
-“भाजपजवळ 303 तर शिवसेनेजवळ 18 खासदार; राम मंदिर करायला आणखी काय पाहिजे”
-सार्वजनिक बँकांना बुडवण्यात भाजप नेते पु़ढे; ‘या’ नेत्यावर काँग्रेसने केला आरोप
Comments are closed.