Top News महाराष्ट्र मुंबई

राजेशभैय्या सारखा सुपुत्र महाराष्ट्राला देणाऱ्या शारदाताई आपल्यातून गेल्या, सुप्रिया सुळे हळहळल्या

मुंबई |  राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या आई शारदाताई टोपे यांचे शनिवारी रात्री साडे दहाच्या सुमारास दुख:द निधन झालं. त्या 74 वर्षाच्या होत्या. शारदाबाई टोपे यांच्या निधनाचं वृत्त कळताचं राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे हळहळल्या आहेत. राजेशभैय्या सारखा सुपुत्र महाराष्ट्राला देणाऱ्या शारदाताई आपल्यातून गेल्या, अशा भावना सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केल्या आहेत.

दवाखान्यात उपचार घेत असतानाही शारदाताईंनी राजेशभैय्यांना, माझ्यापेक्षा राज्याच्या आरोग्याची काळजी घे असंच सांगितलं.आपलं दुःख बाजूला ठेवत कोरोनाच्या संकटात ठामपणे उभा राहून त्याचा सामना करणारा राजेशभैय्या यांच्यासारखा पुत्र महाराष्ट्राला देणाऱ्या शारदाताई आज आपल्यातून गेल्या, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.

माजी खासदार अंकुशराव टोपे यांच्याशी विवाहबद्ध झाल्यानंतर त्यांच्या पाठीशी त्या खंबीरपणे उभ्या राहिल्या. तसंच कोरोनाच्या काळात देखील माझ्यापेक्षा महाराष्ट्राची अधिक काळजी घे, असं शारदाताईंनी राजेशभैय्यांना सांगितल्याची आठवण सुप्रिया सुळेंनी सांगितली.

टोपे कुटुंबियांवर झालेला हा आघात सहन करण्याची शक्ती ईश्वर त्यांना देवो, असं म्हणत शारदाताई टोपे यांना सप्रुिया सुळे यांनी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे. ट्विट करून त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

 

 

गेल्या दोन महिन्यांपासून पासून शारदाताई टोपे यांच्यावर बॉम्बे रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते. एकीकडे आईची काळजी घेणं आणि दुसरीकडे कोरोनाची लढाई लढणं अशी दुहेरी कसरत गेल्या महिनाभरापासून राजेश टोपे यांची सुरू होती. मात्र काल रात्री उशिरा शारदाताईंची आजाराशी सुरु असलेली झुंज अखेर संपली.

महत्त्वाच्या बातम्या-

आरोग्यमंत्री राजेश टोपेंच्या आईचे दीर्घ आजाराने निधन

“यूएई सुरक्षित नाही, IPL 2020 भारतातच खेळवा”

पुढील 4 ते 5 दिवसांमध्ये ‘या’ भागात मुसळधार पावसाची शक्यता

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या