घड्याळाचे काटे फिरले…, शरद पवारांना मोठा झटका; चिन्ह, पक्ष अजित पवारांकडेच

Ajit Pawar

NCP Symbol | राज्यातील राजकारणामध्ये मोठी खळबळ उडाली आहे. कारण अनेक दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर आणि पक्षाच्या घड्याळ या चिन्हावर (NCP Symbol) राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दावा केला होता. हा दावा निवडणूक आयोगानं मान्य केला आहे. यामुळे शरद पवार यांना मोठा धक्का बसला आहे. या पक्षावर आता अजित पवार यांचा अधिकार असणार आहे.

शरद पवारांना धक्का

शिवसेना पक्षामध्ये उद्धव ठाकरे आणि शिंदे गट असे दोन गट पडले आहेत. यावेळी देखील निवडणूक आयोगानं शिंदे गटाला धनुष्यबाण हे चिन्ह दिलं आहे. तर शिवसेना पक्ष हा एकनाथ शिंदेंचा पक्ष म्हणून घोषित केला आहे. हीच परिस्थिती आता शरद पवार गटाची पाहायला मिळत आहे. यामुळे आता शरद पवारांच्या अडचणीत वाढ होऊ लागली आहे.

वेगळा गट करा नाहीतर…

निवडणूक आयोगानं दिलेला निकाल हा शिवसेना पक्षाच्या निकालाआधारे दिला आहे. आमदारांची संख्याबळ  ही अजित पवार गटाची अधिक असल्याचं निवडणूक आयोगानं सांगितलं आहे. यामुळे आता पक्ष आणि चिन्हाचे दावेदार हे अजित पवार आहेत. तसेत शरद पवार यांचा वेगळा गट असावा नाहीतर त्यांनी अपक्ष निवडणूक लढवावी असा निकाल निवडणूक आयोगानं दिला आहे.

वेळ गेली नाही

7 फेब्रुवारी रोजी शरद पवार गटाला आपला स्वतंत्र पक्ष तयार करण्याबाबत संधी आहे. मात्र यासाठी शरद पवार यांना 7 फेब्रुवारीला दुपारी 4 वाजेपर्यंत काहीच तासांचा वेळ असून यावेळेत निवडणूक आयोगाकडे स्वतंत्र पक्षासाठी मागणी करावी. जर मागणी केली नाहीतर त्यांना अपक्ष म्हणून निवडणुकीमध्ये लढावं लागेल.

जितेंद्र आव्हाड काय म्हणाले?

“आश्चर्य वाटत नाही. ज्या दिवशी आमची राष्ट्रीय मान्यता काढली तेव्हाच मनामध्ये पाल चुकचुकली. पुढे काहीतरी घडणार आहे. आम्ही निवडणूक आयोगाला सर्व सांगून आणि पटवून दिलं आहे. एकही मुद्दा राहिला नव्हता. पक्ष आणि चिन्ह काढून घेण्याच्या अटीवर हे सर्व करण्यात आलं”, असल्याची भावना आव्हाडांनी व्यक्त केली आहे.

“आमचं नवं नाव शरद पवार”

“आमचं नवं नाव हे शरद पवार आहेत. कोणाच्या जीवावर निवडणुका जिंकल्या आहेत? अजित पवार, सुनिल तटकरे कोणामुळे ओळखले जातात. मी काल जे बोललो की मरण यातना देत आहेत ज्या माणसाला जे बाळ या माणसाने जन्माला घातलं आहे”, अशी भावनिक प्रतिक्रिया आव्हडांनी दिली.

News Title – ncp symbol party election commission elected to ajit pawar

महत्त्वाच्या बातम्या

मंत्रिमंडळाच्या बैठकीत मोठा निर्णय, एकनाथ शिंदेंनी केली घोषणा

‘खूप काही चुकीचं…’; रोहित शर्माची पत्नी रितीकाच्या कमेंटने खळबळ

‘माझ्या मुलीला डॉक्टरांच्या हातात देताना….’; मुलीच्या ओपन हार्ट सर्जरीबाबत करण सिंह ग्रोवरचा मोठा खुलासा

58 वर्षांच्या आमिर खानला करायचाय ‘रोमान्स’, थेट म्हणाला…

केंद्रीय मंत्री स्मृती इराणींचा ‘तो’ फोटो पाहून नेटकरी झाले चकित!

 

Join WhatsApp

Join Now

अधिक चांगल्या अनुभवासाठी ही बातमी Chrome मध्ये उघडा! आपण सध्या Facebook च्या ब्राउझरमध्ये हे पेज पाहत आहात. कृपया वरच्या उजव्या कोपऱ्यातील तीन बिंदूंवर क्लिक करून Open in external browser पर्याय निवडा .