भाजप सत्तेत आल्यास 3 महिन्यात राज्य लोडशेडिंगमुक्त करु, आश्वासनाचं काय झालं?

मुंबई | महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात होणाऱ्या भारनियमनावरून राष्ट्रवादीने सोशल मीडियावर पोस्टरबाजी करत मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल केला आहे. ‘जवाब दो’ या मोहिमेअंतर्गत राष्ट्रवादीने ट्विटरवर पोस्टर शेअर केले आहेत.   

सत्तेत आल्यावर 3 महिन्यात राज्य लोडशेडिंगमुक्त करण्याच्या बाता करणाऱ्यांनी महाराष्ट्र अंधःकारात नेऊन ठेवला आहे, असा आरोप राष्ट्रवादीने केला आहे. 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्याचे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा कारभार नियोजनशून्य आहे, असा घणाघातही राष्ट्रवादीने केला आहे.

दरम्यान, स्वप्नाळू मुख्यमंत्र्यांना आणि ऊर्जामंत्र्यांना कोळशाचे नियोजन जमले नाही म्हणून अवघ्या महाराष्ट्राने किती दिवस अंधारात चाचपडत रहायचे?, असा सवाल राष्ट्रवादीने उपस्थित केला आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

-#MeToo | मराठीत Black Rose चळवळ

-सत्ताधाऱ्यांकडून अपेक्षा ठेवणं चुकीचं; संघाचा मोदींवर अप्रत्यक्ष हल्ला

-#MeToo मुळे इम्रान हाश्मी सावध; सुरक्षेसाठी करतोय ‘अशी’ तयारी

-राज्याच्या राजकीय वर्तुळात एकाच नावाची जोरदार चर्चा… सत्यजित तांबे!

-विराट म्हणतोय, “भारतात बनवलेल्या बॉलनं खेळायला नको!”

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

तुमच्या पसंतीच्या बातम्या