Top News महाराष्ट्र मुंबई

“काँग्रेस पक्षाला राष्ट्रवादी काँग्रेस वाळवी सारखं पोखरतोय”

मुंबई | राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या पक्षांनी एकत्र येत महाविकास आघाडी सरकार स्थापन करत भाजपला सत्तेपासून दूर ठेवलं. भाजप वारंवार हे सरकार पडणार असल्याचं बोलत आहे. महाविकास आघाडी सरकारमध्ये काही धुसफुस असल्याचं बोललं जात आहे. मात्र अशातच मुंबई काँग्रेसचे सरचिटणीस विश्वबंधू राय यांनी थेट काँग्रेस सोनिया गांधींना पत्र लिहिलं आहे.

पक्षाला महाविकास आघाडी सरकारमध्ये एकट पाडलं जात आहे. सरकार आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष काँग्रेस पक्षाला वाळवीप्रमाणे हळूहळू संपवण्याचं काम करत असल्याचं विश्वबंधू राय यांनी पत्रात म्हटलं आहे. याबाबत मुंबई मिररने वृत्त दिलं आहे.

एक वर्षानंतरही काँग्रेस महाविकास आघाडी सरकारमध्ये आहे. मात्र शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे दोन पक्षचं सरकार चालवण्याचं काम करत असल्याचं राय यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, ठाकरे सरकारमध्ये काँग्रेसच्या मंत्र्यांना पक्षासाठी तळागळातील लोकांपर्यंत काम करण्याची संधी मिळत नाही. त्यामुळे सर्वसामान्य जनता आणि पक्षाच्या कार्यकर्त्यांनाच त्यांच्या मंत्र्यांकडे कुठलं खात आहे, हे माहिती नसल्याचंही राय यांनी पत्रात म्हटलं आहे. यावर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांची काय प्रतिक्रिया येते हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

थोडक्यात बातम्या-

जिओने आपल्या ग्राहकांना दिलं मोठं गिफ्ट; फुकट वापरा ‘ही’ सेवा!

क्रेटाला टक्कर देण्यासाठी MG सज्ज; येतेय ही जबरदस्त कार, पाहा लूक आणि फिचर्स

पती दिल्लीला; बॉयफ्रेंडलाही आला अनैतिक संबंधाचा संशय, घडला धक्कादायक प्रकार

सरकार कुणाचंही असलं तरी बाटली जुनी आणि पाणी नवं, एल्गार परिषद होणारच- बी. जी. कोळसे पाटील

वाहनचालकांना मोठा दिलासा; फास्टटॅग लावण्यासाठी ‘या’ तारखेपर्यंत मुदवाढ

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या