बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘राष्ट्रवादी अडीच वर्षांनंतर मुख्यमंत्रिपदावर दावा करेल पण…’; संजय राऊतांचा खुलासा

मुंबई | राष्ट्रवादी आणि शिवसेनेत मुख्यमंत्रिपदाचा फॉर्म्युला ठरला असून त्यावर वाद होईल आणि सरकार पडेल, अशी चर्चा रंगली आहे. पण, असं जे पसरवलं जात आहे त्यात काहीच तथ्य नाही. शिवसेनेला मुख्यमंत्रिपद हा पाच वर्षांसाठी दिलेला शब्द आहे, असा खुलासा शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे.

संजय राऊत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पंतप्रधान मोदी यांच्या भेटीवर सामनाच्या रोखठोक या सदरातून भाष्य केलं आहे. तसेच शिवसेनेला मुख्यमंत्रिपद हा पाच वर्षांसाठी दिलेला शब्द आहे, असं राऊत यांनी सांगितलं.

देवेंद्र फडणवीस सांगतात, ठाकरे यांचे सरकार पाडण्यात आम्हाला रस नाही. त्याच वेळी चंद्रकांत पाटील ठामपणे सांगतात, महाराष्ट्र झोपेत असताना सरकार पडेल. कोणाला कळणार नाही. भाजपचे धोरण स्पष्ट दिसत नाही. सरकारचं काय करायचं ते फडणवीस व पाटील यांनी एकाच टेबलावर बसून काय ते ठरवायला हवं, असा टोला राऊतांनी लगावला आहे.

ईडी, सीबीआयसारख्या तपास यंत्रणांचा वापर करून एखाद् दुसरा आमदार गळास लागेल, पण त्यातून बहुमताचा आकडा जमणार नाही हे सत्य स्वीकारण्याची मानसिकता विरोधकांनी ठेवायला हवी, असं म्हणत राऊतांनी भाजपवर निशाणा साधलाय.

थोडक्यात बातम्या- 

केंद्र सरकारचा 1 निर्णय आणि कोट्यवधी सरकारी कर्मचाऱ्यांना झटका!

“काँग्रेसचा आमदार किंवा खासदार नसला तरी तुम्ही निराश होऊ नका, कारण…”

ह्रदयद्रावक! कोल्हापुरातील 38 वर्षीय तरुण प्राध्यापकाचा कोरोनामुळे मृत्यू

‘दोन डोस मधील अंतर वाढवू नका, अन्यथा…’; अमेरिकेतील दिग्गज डॉक्टरांचा इशारा

विदर्भातील ‘या’ जिल्ह्याने करुन दाखवलं, काहीच दिवसांत संपूर्ण जिल्हा कोरोनामुक्त!

Shree

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More