Top News

राष्ट्रवादी काँग्रेसची पहिली यादी तयार; विद्यमान खासदारांना मिळणार संधी?

मुंबई | राष्ट्रवादी काँग्रेसची लोकसभा निवडणुकीसाठी 11 लोकसभा मतदारसंघांची पहिली यादी लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी कडून विद्यमान खासदारांना पुन्हा संधी देण्यात येणार असल्याचं समोर येत आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसकडून बारामतीमध्ये सुप्रिया सुळे, साताऱ्यात उदयनराजे भोसले, कोल्हापूरमध्ये धनंजय महाडिक, माढ्यातून विजयसिंह मोहिते पाटील, भंडारा गोंदियातून मधुकर कुकडे यांना पून्हा एकदा संधी देण्यात येणार आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसकडून नाशिकमध्ये समीर भुजबळ, रायगडमध्ये सुनील तटकरे, बुलडाणामध्येे राजेंद्र शिंगणे, ठाणेमधून संजीव नाईक, उस्मानाबाद मधून अर्चना पाटील किंवा राणा जगजित, ईशान्य मुंबईतून संजय दीना पाटील यांना उमेदवारी मिळू शकते.

दरम्यान, हातकणंगले मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस खासदार राजू शेट्टी यांच्यासाठी सोडणार आहे.

महत्वाच्या बातम्या-

5 मिनिटांच्या भेटीत राफेलवर एकदाही चर्चा झाली नाही; मनोहर पर्रिकरांनी लिहलं पत्र

धक्कादायक! महात्मा गांधींच्या पुतळ्यावर हिंदू महासभेच्या कार्यकर्त्यांनी झाडल्या गोळ्या

पटक देंगे म्हणणाऱ्या अमित शहांचा सूर बदलला; उद्धव ठाकरेंना केला फोन

-काँग्रेसला राम जन्मभूमीबद्दल बोलण्याचा अधिकार नाही- अमित शहा

काँग्रेसकडून पुण्यासाठी मोहन जोशी आणि अभय छाजेड यांच्या नावाची शिफारस

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या