पुणे महाराष्ट्र

राष्ट्रवादीची उमेदवारी उदयनराजेंना मिळणार; अजित पवारांनी दिले संकेत

सातारा | राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सर्वांना एका गाडीत घातल्यानं मनोमिलनाचा पहिला गियर पडलाय, लवकरच टाप गियर देखील पडेल, अशा शब्दात साताऱ्याची उमेदवारी खासदार उदयनराजे भोसले यांना मिळणार असल्याचे संकेत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी दिले आहेत. ते कराड येथे पत्रकारांशी बोलत होते.

महाराष्ट्र दुष्काळात होरपळत असताना सत्ताधारी उपाययोजना करण्याऐवजी कर्नाटकमधील जेडीएस आणि काँग्रेसचं सरकार पाडण्याचा प्रयत्न करत आहेत, अशी टीका त्यांनी केली आहे.

भाजप सरकारच्या काळात शिक्षणाचा खेळखंडोबा झाला आहे, नोकरभरती ठप्प झाली आहे, असं अजित पवार यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, ऊसाच्या एफआरपीच्या प्रश्नावर विविध संघटना आंदोलन करत असताना एफआरपीचा प्रश्न सुटत नाही, असं अजित पवार म्हणाले आहेत.

महत्वाच्या बातम्या-

-पंतप्रधान मोदी म्हणाले तुमचा मुलगा पबजी खेळतो का?

-“भाजप आणि काँग्रेस एकाच नाण्याच्या दोन बाजू”

प्रकाश आंबेडकरांना सोलापुरची जागा देण्यास काँग्रेसचा नकार??

लवकर बरं व्हा! राहुल गांधींनी मनोहर पर्रिकरांना दिल्या शुभेच्छा

लोकसभेच्या ‘एवढ्या’ जागांवर काँग्रेस-राष्ट्रवादीमध्ये एकमत! लवकरच आघाडीची घोषणा

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या