पुणे | पुण्यामध्ये उपराष्ट्रपतीच्या स्वागतासाठी आलेल्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक केली आहे. पुणे महापालिकेच्या नव्या इमारतीच्या उद्घाटनाला उपराष्ट्रपती वैकंय्या नायडू आले होते. तेव्हा हा प्रकार घडला.
उपराष्ट्रपती पहिल्यांदाच शहरात आले होते म्हणून आम्ही राष्ट्रवादीच्या वतीने त्यांचा सत्कार करणार होतो, पण आम्हांला प्रवेशद्वाराजवळ उभं राहू न देता हाकललं, असं राष्ट्रवादी कॉंग्रेस पुणे महापालिकेचे विरोधी पक्ष नेते चेतन तुपेंनी सांगितलं.
इमारतीचं भूमीपुजन शरद पवारांच्या हस्ते झालं होतं पण उदघाटन समारंभाच्या कौन्सिलवर त्यांचं नाव न टाकल्यामुळे कार्यकर्त्यांनी त्यांचा निषेध केला.
महत्त्वाच्या बातम्या –
-फडणवीसांसोबत उद्घाटन समारंभाला उपस्थित राहणं पवारांनी टाळलं
-इथं लोकांना खायला अन्न नाही, मोदी म्हणतात योगा करा- अशोक चव्हाण
-आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या कार्यक्रमाला नितिश कुमारांनी फिरवली पाठ
-भाजप दहशतवादी संघटना आहे- ममता बॅनर्जी
-पंतप्रधानांच्या घरी हलला पाळणा!