बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

रेमडेसिवीर इंजेक्शन हवंय?, राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यानं शेअर केला भाजप नेत्याचा नंबर

पुणे | राज्यात कोरोना रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. या कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी वापरण्यात येणाऱ्या रेमडेसीविर या औषधाचा तुटवडा गेल्या काही दिवसांपासून जाणवत होता. आता या औषधाच्या खाजगी वितरणावर सरकारने बंदी घातली आहे. पण याच रेमडेसीविर औषधासाठी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यानं एका भाजप नेत्याचाच नंबर शेअर केल्यानं भाजप नेत्याची झोप उडाली आहे.

नामदेव ढाके हे पिंपरी चिंचवड महापालिकेचे नेते आहेत. त्यांना दोन दिवसापूर्वी अचानक रेमडेसीविर औषधासाठी फोन येऊ लागले. कोरोनाबाधित रुग्णांच्या नातेवाईकांचे त्यांना फोन येऊ लागले. रात्री मध्यरात्री त्यांना फोन येऊ लागल्यानं त्यांची चांगलीच झोप उडाली. या प्रकरणात त्यांनी अधिक तपास केल्यावर लक्षात आलं की, राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी त्यांचा मोबाईल नंबर सोशल मीडियावर शेअर केला आहे. पिंपरी चिंचवडमध्ये कोणाला रेमडेसीविर पाहिजे असेल त्यांनी त्वरित संपर्क साधावा, असा मथळा या पोस्टमध्ये दिला होता.

काही दिवसांपूर्वी गुजरातमधील भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयात रेमडेसीविरचा मोठा साठा आढळून आला होता. त्यानंतर भाजप नेत्यांकडून रेमडेसीविरची साठवणूक होत असल्याचा आरोप केला जात होता. त्यानंतर आता राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनं नामदेव ढाकेंचा मोबाईल नंबर सोशल मीडियावर शेअर केला होता.

दरम्यान, या संपूर्ण प्रकरणाची जबाबदारी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांने स्वीकारली आहे. इंजेक्शन न मिळाल्याने लोकांचा जीव जात होता असं मला समजलं. लोकांचा त्रास कमी व्हावा यासाठी हे कृत्य केल्याचं, राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनं सांगितलं आहे.

थोडक्यात बातम्या-

पहिल्या भेटीतच महिला काढायला लावायच्या कपडे, मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश

“खंडणी वसूल करण्याच्या काळात ऑक्सिजनचा साठा केला असता तर जीव वाचले असते”

प्रचाराचा असाही फंडा!, राजू शेट्टींनी वापरली ‘ही’ भन्नाट आयडिया

राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या ‘कोर्ट’मधील वीरा साथीदार यांचं कोरोनामुळे निधन

भारतात जन्मली 2 डोके, 3 हात असलेली मुलगी अन्…

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More