नाशिक | केंद्र आणि राज्य सरकारच्या अपयशामुळे बेरोजगारीत दिवसेंदिवस वाढ होत आहे, असा आरोप करत सरकारविरोधात राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांच्या नेतृत्वाखाली नाशिकरोड रेल्वे स्थानकात राष्ट्रवादी युवक काँग्रेसने रेल रोको आंदोलन केले.
राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष सुरज चव्हाण, पुरूषोत्तम कडील, अंबादास खैरे यांनी देखील या आंदोलनात सहभागी होत आक्रमकपणे सरकारविरोधात भूमिका मांडली.
जवाब दो जवाब दो फडणवीस सरकार जवाब दो… अशा घोषणांनी नाशिकरोड रेल्वेचा परिसर राष्ट्रवादी युवकच्या कार्यकर्त्यांनी दणाणून सोडला होता.
दरम्यान, गेल्याच आठवड्यात मेहबूब शेख यांनी पदावर नियुक्त होताच गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहतांच्या राजीनाम्याची मागणी करण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या निवासस्थानी धडक दिली होती. त्यांच्या आंदोलनानंतर झालेल्या मंत्रीमंडळ विस्तारात मेहतांना डच्चू देण्यात आला आहे.
महत्वाच्या बातम्या
-धनंजय मुंडे अज्ञानी.. म्हणून तर त्यांनी असा प्रश्न उपस्थित केला; चंद्रकांत पाटलांची टीका
-राष्ट्रवादी-अभाविपचे कार्यकर्ते भिडले; पुणे विद्यापिठाच्या नाशिक कार्यालयात धुमाकूळ
-वंदे मातरम इस्लामविरोधी आहे, आम्ही म्हणणार नाही- सपा खासदार
-निवडणुकीच्या तोंडावर राज्य सरकारचं तरूणांना मोठं आश्वासन
-स्वराज्याची राजधानी ‘रायगड’साठी राज्य सरकारची मोठी घोषणा
Comments are closed.