बीड | कोरोनाने हातावर पोट असणाऱ्या कामगार वर्गावर तसंच गोरगरिब जनतेवर मोठा परिणाम केला आहे. अशा परिस्थितीत त्यांच्या भुकेचा प्रश्न निर्माण झाला आहे. राष्ट्रवादी युवक काँग्रेसने सामाजिक बांधिलकी जपत गोरगरिबांना मदतीचा हात दिला आहे. (NCp Youth Congress president Mehboob Shaikh Help Needy People)
राष्ट्रवादीचे युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांच्या वतीने शिरूरच्या स्वामी समर्थ मंदिर परिसर, इंदिरा नगर भागातील गोरगरिब नागरिकांना गहू, ज्वारी आणि तांदुळ या जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. सामाजिक बांधिलकीच्या नात्याने आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो या भआवनेतून आपण ही मदत केल्याचं मेहबूब शेख यांनी सांगितलं. (NCp Youth Congress president Mehboob Shaikh Help Needy People)
200 गरीब कुटुंबांना प्रति कुटुंब गहू, बाजरी, तांदूळ असे एकूण 14 किलो धान्य वाटण्यात आले. यावेळी शिरूरचे तहसीलदार श्रीराम बेंडे, मंडल अधिकारी बाळू खेडकर, मेहबूब शेख उपस्थित होते. (NCp Youth Congress president Mehboob Shaikh Help Needy People)
दरम्यान, राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या मदतीनंतर नागरिकांनी समाधान व्यक्त केलं. आमचा पुढच्या काही दिवसांचा पोटाचा प्रश्न सुटला असल्याची भाना त्यांनी यावेळी बोलून दाखवली.
ट्रेंडिंग बातम्या-
कोरोनाचा असाही परिणाम; गंगामाई घेऊ लागली आहे मोकळा श्वास!
कोरोना बरा होण्यासाठी दररोज गाढविनीचं दूध प्या; या नेत्यानं तोडले अकलेचे तारे
महत्वाच्या बातम्या-
उद्धव ठाकरे सरकारचे निर्णय अपुरे, मंत्र्यांमध्ये समन्वय नाही- देवेंद्र फडणवीस
“मोदी द्वेषापोटी केंद्र सरकारने दिलेले मोफत धान्य ठाकरे सरकार वाटत नाही”
पार्थ पवार फाऊंडेशनचा गरजू लोकांना मदतीचा हात; हजारो जणांना मोफत जेवण
Comments are closed.