कोल्हापूर | ज्या खेकड्यांनी तिवरे धरण फोडून 23 लोकांचा जीव घेतला, त्या खेकड्यांवर 302 चा गुन्हा दाखल करा, अशी मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने करण्यात आली आहे. संबंधित अधिकाऱ्यांवर आणि मंत्र्यांवर कारवाई करावी याकरिता राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांच्या नेतृत्वाखाली कोल्हापूरात तीव्र आंदोलन केलं.
तिवरे धरण दुर्घटनेत खेकड्यांनी धरण फोडलं, अशी प्रतिक्रिया जलसंपदा मंत्री तानाजी सावंत यांनी दिली होती. यावर विरोधकांसोबतच सर्वसामान्यांच्या संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.
धरणाला भगदाड पडल्याची तक्रार स्थानिकांनी केली होती मात्र प्रशासनाने ,याकडे दुर्लक्ष केलं. याची गांभिर्याने दखल घेतली असती तर हा प्रसंग ओढावला नसता, असं राष्ट्रवादीने म्हटलं आहे.
दरम्यान, राष्ट्रवादी आमदार जितेंद्र आव्हाड यांनीही थेट पोलिस स्टेशन गाठत खेकड्यांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
महत्वाच्या बातम्या-
-“प्रकाश आंबेडकरांची भूमिका आणखीनही भाजपला मदत करण्याचीच”
माजी सनदी अधिकाऱ्यांचा लोकसभा निवडणुकीबाबत सगळ्यात मोठा गौप्यस्फोट
-कोवळ्या जीवांशी खेळ; बीडमध्ये 10 चिमुरड्यांंना विषबाधा
-पेट्रोल-डिझेल महागणार; मोदी सरकारचा सर्व सामान्यांच्या खिशावर डल्ला
…तर त्या 18 निष्पाप लोकांचा जीव वाचला असता!
Comments are closed.