Loading...

… म्हणून राष्ट्रवादी युवकने जिल्हाधिकारी कार्यालयावर काढला आसूड मोर्चा!

भंडारा | भंडारा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात दुष्काळ पडला असून प्यायला पाणी नाही. भाताची पेरणी रखडलेली आहे. अशा परिस्थितीत सरकारने भंडारा जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करावा, या मागणीसाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेसने आज भंडारा जिल्हाधिकारी कार्यालयावर आसूड मोर्चा काढला.

राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या मोर्चात असंख्य राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित होते. या मोर्चाचे नेतृत्व राष्ट्रवादी युवकचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांनी केलं. या मोर्चात कार्याध्यक्ष रविकांत वरपे यांनी देखील सहभाग घेतला होता.

Loading...

आज या जिल्ह्यात कुठेही पेरणी झालेली दिसत नाही. भंडारा जिल्ह्यातील शेतकरी संकटात असून शासन मात्र गाढ झोपलेले आहे. या झोपी गेलेल्या सरकार हे दिसत नाही काय?? या झोपलेल्या सरकारला जागे करण्यासाठीच आजचा हा आसूड मोर्चा आहे, असं मेहबूब शेख म्हणाले.

जोपर्यंत या सरकारमध्ये फसनवीस आणि फशिवसेना आहे… तोपर्यत सामान्य जनतेला न्याय मिळणार नाही, असं प्रदेश कार्याध्यक्ष रविकांत वरपे म्हणाले .

Loading...

दरम्यान, राष्ट्रवादी युवक काँग्रेस शेतकऱ्यांच्या आणि युवकांच्या प्रश्नांवर चांगलीच आक्रमक झालेली दिसून येत आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

-मायावतींच्या भावाला आयकर विभागाचा दणका; केली मोठी कारवाई

-“विधानसभेसाठी ‘वंचित’सह सर्व विरोधी पक्षांना एकत्र आणणार म्हणजे आणणार”

Loading...

-वर्ल्डकपनंतर लगोलग BCCI ने विराट कोहलीला दिला मोठा धक्का!

-पार्थ पवार विधानसभेची निवडणूक लढवणार? अजित पवार म्हणतात..

-‘त्यानं’ षटकार मारला अन् दुर्दैवाने त्याचवेळी त्याच्या गुरूंनी प्राण सोडला!

Loading...