Top News पुणे महाराष्ट्र

‘ट्रोलर्सच्या पाठीमागे फडणवीस अन् डावखरे तर नाहीत ना?’; आव्हाड प्रकरणावरून राष्ट्रवादी युवक आक्रमक

पुणे |  ज्यावेळी भाजप आणि संघाचे लोक शरद पवार आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांना अर्वाच्य आणि गलिच्छ भाषेत ट्रोल करत होते त्यावेळी तत्कालिन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप नेते निरंजन डावखरे यांनी त्या ट्रोलर्सला का अडवले नाही. आणि आताही ते अडवताना दिसून येत नाही. आता अशाच एका ट्रोलर्सला मारहाण झाल्यावर त्याच्या समर्थनार्थ फडणवीस आणि डावखरे मैदानात उतरले आहेत. मग आम्हाला प्रश्न आहे की ट्रोलर्सच्या पाठीमागे फडणवीस आणि डावखरे तर नाहीत ना?, असा संशय राष्ट्रवादी युवकचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांनी व्यक्त केला आहे.

टीका करा पण टीकेची पातळी असली पाहिजे. पातळी सोडून जर एखादा आई बहीणीवर बलात्कार करायची भाषा करू लागला तर माणसाच्या संयमाचा बांध सुटणारच ना?. गेल्या अनेक दिवसांपासून संबंधित व्यक्ती जितेंद्र आव्हाड यांच्याविषयी आणि त्यांच्या कुटुंयांविषयी अश्लिल शब्दात सोशल मीडियावर लिहीत होता. अनेक घृणास्पद पोस्ट त्याने लिहिल्या आहेत. मग त्यावेळी भाजपच्या लोकांनी त्याला का अडवले नाही?, असा सवाल त्यांनी केला आहे. तसंच त्यांच्यापाठीमागचा बोलवता धनी कोण आहे याचा शोध घेणे गरजेचे आहे, असंही ते म्हणाले आहेत.

गेल्या 5 वर्षाच्या काळात आघाडी बिघाडी वा फेसबुक पेजवरून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार तसंच अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांच्यावर अतिशय अश्लिल शब्दात टीका करण्यात आली. तसंच मीम्स बनवून मोठ्या प्रमाणात शेअर करण्यात आल्या. सर्वसामान्य लोक इतक्या खालच्या थराला जाऊ शकत नाही. हे काम फक्त भाजपच्या आयटी सेलची पिलावळ करू शकते, अशी टीका शेख यांनी केली आहे.

दरम्यान, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांनी या प्रकरणी लक्ष घालून या ट्रोलर्सला वेळीच आवरलं पाहिजे आणि त्यांच्यावर कारवाई केली गेली पाहिजे, अशी मागणी आम्ही करत असल्याचं शेख यांनी यावेळी सांगितलं.

 

 

ट्रेंडिंग बातम्या-

“मुंबई अडीच लाख कोटी केंद्राला देते, त्यातील 25 टक्के महाराष्ट्राला द्या”

358 तहसील आणि 44 हजार गावं तर एका गावाला किती शिवथाळी??; भाजपचा सवाल

महत्वाच्या बातम्या-

डोनाल्ड ट्रम्प यांची WHO ला धमकी, म्हणाले…

कोरोनाचा संसर्ग वाऱ्याच्या वेगाने पसरतोय; देशातली बाधितांची संख्या पोहचली 5 हजारांवर

जितेंद्र आव्हाड तुझा दाभोलकर होणार; तरुणाच्या धमकीनं खळबळ

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या