मुंबई | राष्ट्रवादी काँग्रेसच्या नवनियुक्त युवक प्रदेशाध्यक्ष आणि कार्याध्यक्षांनी पदावर नियुक्ती झाल्याच्या पहिल्याच दिवशी युवक कार्यकर्त्यांसह मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी धडक दिली. मंत्री प्रकाश मेहता यांच्या राजीनाम्याची मागणी यावेळी करण्यात आली.
एमपी मिल कंपाऊंड एसआरए भ्रष्टाचार प्रकरणाबद्दल कार्यकर्त्यांनी मेहतांचा राजीनामा मागितला. यावेळी “प्रकाश मेहता हाय… हाय…”, “भाजप सरकार चोर हैं, भाजप सरकार हाय… हाय…” अशी घोषणाबाजी करण्यात आली.
एक मंत्री घोटाळ्यात अडकल्याचा ठपका ठेवला गेला तरी सत्तेच्या गैरवापर करत सत्ताधारी पक्षाकडून प्रकाश मेहतांवर कोणतीही कारवाई केले गेली नाही. मुख्यमंत्र्यांची क्लिनचिटची ‘एक खिडकी’ योजना सुरूच आहे, असा आरोप यावेळी करण्यात आला.
राष्ट्रवादी युवकचे नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष मेहबुब शेख, कार्याध्यक्ष रविकांत वर्पे आणि सूरज चव्हाण यांच्यासह युवकच्या कार्यकर्त्यांनी या आंदोलनात सहभाग घेतला.
पाहा आणखी फोटो-
महत्वाच्या बातम्या
-मला काँग्रेस अध्यक्ष बनवा; ‘या’ माजी मंत्र्याची पत्र लिहून मागणी
-दानवे म्हणतात, आमचं आधीच ठरलं होतं… दोन महिने आम्ही फक्त नाटक केलं
-काँग्रेसने दिलेल्या ऑफरवर प्रकाश आंबेडकर म्हणतात…
-राष्ट्रवादीसोबत आघाडी करण्याबाबत काँग्रेस सकारात्मक
-मराठवाड्याच्या पुढच्या पिढीला दुष्काळ पाहू देणार नाही- देवेंद्र फडणवीस
Comments are closed.