बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

राष्ट्रवादीचे आमदार अरूण जगताप यांना अटक!

अहमदनगर | राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अरुण जगताप यांना पोलिसांनी अटक केली आहे. ते पोलिसांना शरण आले.

केडगावमध्ये दोन शिवसैनिकांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. त्यावेळी संशयित म्हणून आमदार संग्राम जगताप यांना चौकशीसाठी पोलिस अधिक्षक कार्यालयात नेण्यात आले होते. तेव्हा आमदार अरूण जगताप आणि कार्यकर्त्यांनी कार्यालयाची तोडफोड केली होती. त्या प्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता.

दरम्यान, अरूण जगताप आणि शंभू गिरवले हे दोघे भिंगार कॅम्प पोलिस ठाण्यात पोलिसांना शरण गेले. त्यानंतर त्यांना अटक करण्यात आली आहे.

महत्त्वाच्या बातम्या–

-होय… सत्य बोलण्याचा गुन्हा केलाय, वारकऱ्यांची माफी मागतो- आव्हाड

-मी एवढ्यात रिटायर्ड होणार नाही; रामराजेंच्या वक्तव्यानं हशा

-हिमा दासनं रचला इतिहास; पोरी, आम्हाला तुझा अभिमान वाटतो…!!!

-…तर मी इथेच विष घेऊन आत्महत्या करेन- सुनील तटकरे

-सहावीच्या पुस्तकात गुजराती मजकूर; विरोधकांचा मोठा गदारोळ

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More