Top News महाराष्ट्र मुंबई

उत्तर प्रदेशातील महिला अत्याचारांविरोधात राष्ट्रवादीचं महाराष्ट्रात घंटानाद आंदोलन!

मुंबई | उत्तर प्रदेश राज्यात महिलांवरील वाढत्या अत्याचाराच्या विरोधात राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीने उद्या राज्यभर महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या नेतृत्वाखाली तीव्र निदर्शने करण्यात येणार आहेत.

नियोजित कार्यक्रमानुसार सकाळी 11.30 वाजता प्रत्येक जिल्हा आणि शहरातील मुख्य पाल कार्यालयाबाहेर जमून घंटानाद करीत निदर्शने करत टपाल मास्टर यांना महिला कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री अजय बिष्ट यांच्या नावे लिहिलेली पत्रे त्यांच्यापर्यंत पाठविण्यासाठी दिली जातील.

मी स्वतः पुणे येथील लक्ष्मी रोड,सिटी पोस्ट टपाल कार्यालयाबाहेर हे आंदोलन करणार आहे. उत्तर प्रदेशातील महिलावरील अत्याचार दिवसेंदिवस वाढत असून त्याबाबत अजय बिष्ट सरकार गंभीर नाही. त्यामुळेच त्यांचे योगी आदित्यनाथ हे नाव न वापरता त्यांच्या मूळ नावे त्यांना पत्रे दिली असल्याचंं चाकणकर यांनी म्हटलं आहे.

योगी हा शब्द फार जबाबदारीचा असून ही जबाबदारी पार पाडण्यास अजय बिष्ट सक्षम नसल्यामुळे त्यांचा तसा उल्लेख या पत्रात टाळला आहे. फक्त शहरांची नावे बदलण्यातच हे मुख्यमंत्री मश्गुल असून त्यांना महिलांच्या सुरक्षेचे काहीही घेणेदेणे नाही. लहान मुली, युवती, अंगणवाडी च्या 50 वर्षीय महिलादेखील या राज्यात सुरक्षित नाहीत, त्यामुळे देशाची प्रतिष्ठा धोक्यात आली असल्याचं चाकणकर म्हणाल्या.

दरम्यान, नामुष्की सहन करावी लागत आहे, अशा आशयाची ही पत्रे लिहिली असून त्याचा भला मोठा गठ्ठा महाराष्ट्रातून जाणार आहे. सन्माननीय पंतप्रधान, केंद्रीय गृहमंञी यांची महिला सुरक्षिततेबाबत जागरूकता नसल्याचे वेळोवेळी दिसून येत आहे. महिला सुरक्षिततेबाबत अपयशी असलेल्या केंद्र सरकार जाहिर निषेध!!!

थोडक्यात बातम्या-

धक्कादायक! मुंबईमध्ये 19 वर्षीय तरुणावर सामूहिक बलात्कार

नाद करा पण जडेजाचा कुठं! आपल्या रॉकेट थ्रोने शतकवीर स्मिथला दाखवला तंबुचा मार्ग; पाहा व्हिडीओ

कांगारूंच्या धर्तीवर रोहित शर्माचं नाणं खणखणलंच; ‘हा’ विक्रम केला नावावर

“माझ्या ट्वीटमुळे कुणाच्या भावना दुखावल्या असतील असं मला वाटतं नाही

“मला धक्के देण्याची सवय, कधी दुसऱ्याला बसतो तर कधी मलाच”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या