राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याला ईडीचा जोर का झटका, संपत्ती होणार जप्त

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

मुंबई | राज्यात महाविकास आघाडीची सत्ता आल्यापासून राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक प्रमुख नेते केंद्रीय तपास यंत्रणांच्या रडारवर आले होते. यापैकी अनिल देशमुख (Anil Desmukh) आणि नवाब मलिक (Nawab Malik) यांना तुरुंगात जावं लागलं होतं.

देशमुख काही दिवसांपूर्वीच तुरुंगातून बाहेर आले होते. तर कोल्हापूरमधील राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांच्या घरीही अलीकडेच ईडीची (ED) धाड पडली होती. तेव्हापासून हसन मुश्रीफ यांच्यावर कोणत्याही क्षणी अटकेची कारवाई होऊ शकते, अशी अटकळ बांधली जात आहे.

यानंतर आता प्रफुल्ल पटेल यांच्या पाठिशी ईडीचा ससेमिरा लागला आहे. ईडीने (ED) प्रफुल्ल पटेल यांना मोठा झटका दिला आहे. ईडीने त्यांच्या मोठी कारवाई केली आहे.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांच्या मालकीचे वरळी येथील सीजे हाऊस इमारतीमधील चार मजले ईडीकडून जप्त करण्यात आले आहेत. सक्तवसुली संचालनालयाने याबाबत माहिती दिली आहे.

सील करण्याची कारवाई मागील वर्षीच करण्यात आली होती. मात्र, ही प्रक्रिया आता पूर्ण झाली ईडी (ED)च्या या कारवाईनंतर आता पटेल कुटुंबाला हे चारही मजले रिकामे करावे लागणार असल्याची माहिती आता समोर आली आहे.

महत्त्वाच्या बातम्या-