Top News महाराष्ट्र सोलापूर

राष्ट्रवादी काँग्रेसची दादागिरी चालू देणार नाही- गोपीचंद पडळकर

सोलापूर | राज्यात राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता येते तेव्हा त्यावेळी त्यांची दादागिरी चालते पण दादागिरीच्या जोरावर गरिबांच्या अन्नात माती कालवणार असाल तर महाराष्ट्र खपवून घेणार नाही, असं भाजप नेते आमदार गोपीचंद पडळकर यांनी म्हटलं आहे.

राज्यातील ऊसतोड मजुरांची सरकार दप्तरी नोंद करून त्यांच्या बाजूचा कायदा आणि मजुरी दरवाढीचा विषय मार्गी लागत नाही तोपर्यंत मजूर हातात कायदा घेणार नसल्याचं गोपीचंद पडळकर यांनी म्हटलं आहे. मंगळवेढा तालुक्यातील मजूर, मुकदम यांच्या मागण्यासंदर्भात बैठक घेण्यात आली होती. त्यावेळी पडळकर बोलत होते.

दरम्यान, स्व. गोपीनाथ मुंडें ऊसतोड आणि वाहतूक संघटनेने राज्यभरात केलेल्या कोयता बंद आंदोसनाला सहकार्य करावं, असं आवाहनही पडळकर यांनी केलं आहे.

महत्वाच्या बातम्या-

“योगी जी, प्रियंका गांधींच्या कपड्यांवर हात टाकणाऱ्या पोलिसांवर कारवाई करा”

‘प्रियंका, तुझी काळजी वाटते पण…’; रॉबर्ट वाड्रा यांचं भावूक ट्विट

राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदेंची कोरोनावर मात

पीडितेच्या कुटुंबीयांना ‘वाय’ सुरक्षा द्या, अन्यथा त्यांना माझ्या घरी घेऊन जातो- चंद्रशेखर आझाद

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या