बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

पुणे जिल्हा बँक निवडणुकीत राष्ट्रवादीचे वर्चस्व, पण अजित पवारांना मोठा धक्का

पुणे | पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणुकीचा (Pune District Cooperative  Bank election) निकाल समोर आला आहे. या निवडणुकीत राष्ट्रवादीने वर्चस्व मिळवलं आहे. पुणे जिल्हा बँकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीला 21 पेकी 17 जागा मिळाल्या आहेत. त्यामुळे पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेवर राष्ट्रवादीने एकहाती सत्ता मिळवली आहे.

जिल्हा बॅंकेवर यापूर्वी 21 पैकी 14 संचालक निवडून आले होते. उर्वरीत 7 जागांसाठी रविवारी निवडणूक झाली होती. या निवडणुकीत राष्ट्रवादीने वर्चस्व मिळवले. मात्र, अजित पवारांना एक मोठा धक्का बसला आहे. राष्ट्रवादीतून भाजपमध्ये गेलेले प्रदीप कंद यांचा विजय झाला आहे. प्रदिप कंद यांना पराभूत करण्यासाठी अजित पवारांनी खास रणनीती आखली होती.

प्रदीप कंद यांचा हा विजय अजित पवारांच्या जिव्हारी लागल्याचं बोललं जात आहे. “एका ठिकाणी आम्ही का कमी पडलो याबाबतची माहिती घेतोय. काय गडबड झाली हे पाहू. मला तिथं डाऊट होताचं आणि तिथं 11 कमी मत पडले,” असं अजित पवारांनी यावेळी बोलून दाखवलं आहे.

दरम्यान, या निवडणुकीत अ वर्ग मतदार संघातून शिरूरमधून आमदार अशोक पवार विजयी झाले आहेत. हवेलीमधून विकास दागंट विजयी झाले आहेत. तर मुळशी तालुका मतदारसंघातून बॅकेचे माजी अध्यक्ष आत्माराम कलाटे यांना धक्का देत सुनील चांदोरे विजयी झाले आहेत.

थोडक्यात बातम्या-

ओबींसींबाबत जितेंद्र आव्हाडांचं वादग्रस्त वक्तव्य, म्हणाले…

धक्कादायक! लस घेतलेल्या ‘इतक्या’ टक्के नागरिकांना कोरोनाची लागण

नितेश राणेंना मोठा दिलासा; तुर्तास अटक होणार नाही

मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना कोरोनाची लागण

मुंबईत लागणार लॉकडाऊन?; आयुक्तांचं मोठं वक्तव्य, म्हणाले…

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More