बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

पुरग्रस्तांसाठी राष्ट्रवादी सरसावली पुढे; तब्बल 2.5 कोटींची मदत जाहीर

मुंबई | महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी गेल्या काही दिवसात झालेल्या धुवाधार पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचं तसेच अनेकांचे प्राण गेल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. त्याच पार्श्वभुमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज तातडीची पत्रकार परिषद बोलावली होती.

आज झालेल्या पत्रकार परिषदेत राष्ट्रवादी पक्षातर्फे शरद पवारांनी नुकसानग्रस्त व पुरग्रस्त भागाला मोठी मदत जाहीर केली आहे. राष्ट्रवादी वेलफेअर ट्रस्टमार्फत तब्बल 2.5 कोटी रूपयांची मदत केली जाणार आहे. 250 डॉक्टरांची तुकडी पुरग्रस्त भागातील नागरिकांची तपासणी करेल, त्यांना योग्य ती औषधे पुरवण्यात येतील, असं शरद पवारांनी स्पष्ट केलं आहे.

राष्ट्रवादी वेलफेअर ट्रस्टकडुन 16 हजार कीट बनवण्यात येणार असुन त्यामध्ये दररोज लागणाऱ्या भांड्यांचा समावेश असणार आहे. त्याचबरोबर ते पुरग्रस्त भागातील 16 हजार कुटुंबांना देण्यात येणार आहे. आज या संबंधीची घोषणा राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत केली आहे.

दरम्यान, या वेळी शरद पवारांनी राजकीय नेत्यांनी पुरग्रस्त व नुकसानग्रस्त भागाचे दौरे टाळण्याची विनंती केली आहे. कारण, संपुर्ण यंत्रणा नेत्यांबरोबर असल्याने मग मदत कार्यात मोठ्या अडचणी निर्माण होतात. शासकिय दौऱ्यांमुळे यंत्रणांचा ताण वाढतो, त्यामुळे आता राजकीय नेत्यांनी दौरे टाळावे, असं शरद पवारांनी म्हटलं आहे.

थोडक्यात बातम्या

आर्थिक संकटांमुळे मोदी सरकार अतिरिक्त नोटा छापणार?; निर्मला सितारामन म्हणतात…

राज कुंद्रा प्रकरणात नवा ट्विस्ट; ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीचं नाव आलं समोर

राज्यात पुन्हा पावसाचं संकट; महाराष्ट्रातील ‘या’ सहा जिल्ह्यांना अलर्ट

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी तळियेत दाखल; नुकसानग्रस्त भागाची करणार पाहणी

महापुरामुळे चिंताग्रस्त असलेल्या शरद पवार यांची तातडीची पत्रकार परिषद

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More