चेहऱ्यावर तलवारीने वार करुन राष्ट्रवादीच्या माजी नगरसेवकाची निर्घृण हत्या

बीड | राष्ट्रवादीच्या माजी नगरसेवकाची अतिशय निर्घृणपणे हत्या करण्यात आल्याची घटना परळी येथे घडली आहे. उड्डाणपुलाखाली पांडुरंग गायकवाड यांची तलवारीने वार करून हत्या करण्यात आली.

पहाटेच्या सुमारास काही अज्ञातांनी गायकवाड यांच्यावर हल्ला केला. त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. या हत्येमुळे परिसरात एकच खळबळ माजली आहे. 

हल्ल्याचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. मात्र अंतर्गत वादातून ही हत्या करण्यात आली असावी, अशी शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.

दरम्यान, पांडुरंग गायकवाड यांच्या पत्नी मीनाबाई गायकवाड या राष्ट्रवादीच्या नगरसेविका आहेत. या हल्ल्यानंतर मारेकरी फरार झाले असून पोलिसांकडून त्यांचा शोध सुरू आहे. 

महत्वाच्या बातम्या-

-बीफ बिर्यानी खाऊन झोपला होतात का? पुलवामा हल्ल्यावरुन ओवेसींचा मोदींना सवाल

-मुंबई इंडियन्सची खराब सुरुवात, दिल्ली कॅपिटलकडून 37 धावांनी पराभव

-तुमची 56 इंचांची छाती आहे, मग ‘कुलभूषण’ला का सोडविले नाही?- शरद पवार

-“मुख्यमंत्र्यांनी राज्यसभेचं आश्वासन दिलंय, आता शेवाळेंना भरघोस मतांनी निवडून आणणार”

–मुख्यमंत्र्यांच्या मिठीने जानकरांचं बंड एका मिनीटात थंड!