बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘भारत बंद’ला राष्ट्रवादी काँग्रेसचा संपूर्ण पाठिंबा – जयंत पाटील

परभणी | देशात काही घटकांमध्ये केंद्र सरकारविरोधात नाराजीचं वातावरण आहे. वाढती महागाई, बेरोजगारी, आणि इंधऩ दरवाढीमुळे सामन्यांच्या खिशाला बसलेल्या कात्रीमुळे अनेकजण संताप व्यक्त करताना दिसत आहेत. त्यातच आता देशातील 100 हून अधिक संघटनांनी भारत बंदची हाक दिली आहे. त्याला आता राष्ट्रवादी काँग्रेसने पाठिंबा दर्शवला आहे.

केंद्र विरोधात येत्या 27 सप्टेंबरला भारत बंदची हाक देण्यात आली आहे. या भारत बंदला राष्ट्रवादी काँग्रेसकडून पाठींबा देण्यात येणार असल्याचं राष्ट्रवादीने स्पष्ट केलंय. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी परभणी येथे पत्रकार परिषदेत यासंदर्भात माहिती दिली आहे.

देशातील असंघटीत कर्मचारी, महिला, विद्यार्थी, प्राध्यापक यांच्या संघटनांनी ही भारत बंदची हाक दिली आहे. हा भारत बंद सकाळी 6 ते दुपारी 4 या वेळेत असणार आहे. या भारत बंदला राष्ट्रवादी काँग्रेसचा संपूर्ण पाठींबा असणार आहे, असं जयंत पाटलांनी सांगितलं आहे.

दरम्यान, यावेळी बोलताना जयंत पाटील यांनी कार्यकर्त्यांना भारत बंद पाळण्याचं आवाहन देखील केलं आहे. तसेचं 27 सप्टेंबरला होणाऱ्या भारत बंदला यशस्वी करण्यासाठी राष्ट्रवादीचा प्रयत्न असणार आहे, असं जयंत पाटील म्हणाले आहेत.

थोडक्यात बातम्या-

किरीट सोमय्यांबाबत त्यादिवशी जे घडलं ते चुकीचंच होतं – अजित पवार

मोठी बातमी! ‘या’ तारखेपासून राज्यातील मंदिरं उघडणार; मुख्यमंत्र्यांकडून सुधारित आदेश जारी

जळगावात भाजपला मोठा धक्का! तब्बल ‘इतके’ नगरसेवक करणार शिवसेनेत प्रवेश

‘किरीट सोमय्यांमध्ये हिंमत असेल तर..’; राजू शेट्टीचं किरीट सोमय्यांना आव्हान

युपीएससीचा निकाल जाहीर! बिहारचा शुभम कुमार देशात पहिला, तर पहिल्या शंभरमध्ये महाराष्ट्रातील तिघं

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More