Top News औरंगाबाद महाराष्ट्र

राष्ट्रवादीचे नवनिर्वाचित आमदार आणि देवेंद्र फडणवीसांचा एकत्र प्रवास; चर्चांना उधाण

औरंगाबाद | राष्ट्रवादी काँग्रेसचे नवनिर्वाचित आमदार सतीश चव्हाण आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी एकच विमानात सोबत प्रवास केला असल्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.

विशेष म्हणजे देवेंद्र फडणवीस आणि सतीश चव्हाण यांनी एकाच सीटवरून हा प्रवास केला. त्यामुळे राजकीय मैदानात याविषयी बोललं जात आहे.

काल म्हणजेच 5 डिसेंबर रोजी संध्याकाळी देवेंद्र फडणवीस हे औरंगाबाद विमानतळावरून मुंबईच्या दिशेने रवाना झाले. तेव्हा आमदार सतीश चव्हाणही त्याच विमानात होते.

दरम्यान, राज्यातील पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघ निवडणुकीचा निकाल शुक्रवारी जाहीर झाला. यामध्ये सहा जगांपैकी पाच जागांव महाविकासआघाडीने घवघवीत यश मिळवले. तर भाजपने केवळ एकाच जागेवर यश प्राप्त केले आहे.

महत्वाच्या बातम्या-

रेखा जरे हत्याकांडप्रकरणी महत्त्वाची घडामोड; आता ही व्यक्ती चौकशीच्या फेऱ्यात

दिल जीत लिया दिलजीत!; शेतकऱ्यांचा थंडीपासून बचाव करण्यासाठी दिले 1 कोटी

“मंत्रिपद गेलं तरी चालेल, ओबीसी आरक्षणाला कोण हात लावतो ते पाहू”

नो मराठी… नो ॲमेझॉन; ॲमेझॉनविरोधात मनसेची नवी मोहीम

“खोटे संदर्भ देऊन कंगणा सतत विष ओकते, तिला रोखलंच पाहिजे”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या