पुणे | राष्ट्रवादी काँग्रेसचे पंढरपूरचे आमदार भारत भलके यांचे अल्पशा आजाराने निधन झाले आहे. पुण्यातील रुबी हॉस्पीटलमध्ये उपचार सुरु असताना रात्री साडे बाराच्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास सोडला.
भारत भलके यांना महिनाभरापूर्वी कोरोनाची लागण झाली होती. त्यातून ते बरेही झाले होते. मात्र त्यानंतर त्यांना डेंगूची लागण झाली. डेंगू, निमोनिया, किडनी आदि आजाराने त्यांची प्रकृती ढासळत गेली. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, मुलगा, तीन विवाहित कन्या आणि दोन भाऊ असा परिवार आहे.
शुक्रवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार भालके यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी गेले होते. मात्र प्रकृती खूपच नाजूक असल्यामुळे डॉक्टरांनी त्यांना व्हेन्टीलेटरवर ठेवले होते.
दरम्यान, भालके यांनी पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे सलग तीन वेळा आमदार म्हणून प्रतिनिधित्व केले होते. 2004 मध्ये भालके यांनी शिवसेनेकडून विधानसभा लढविली होती. गोरगरिबांचा दाता म्हणून भारत नाना भालके यांची जनमानसात छबी होती.
महत्वाच्या बातम्या-
चंद्रकांत पाटलांचा जन्म राजकारणासाठी नव्हे तर…- हसन मुश्रीफ
“मुलगी होईल या भीतीने नितीश कुमार यांनी दुसरं मूल जन्माला घातलं नाही”
100 देशांच्या राजदूतांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबतची सीरम इन्स्टिट्यूट भेट रद्द!
“महाराष्ट्राला कर्तबगार मुख्यमंत्री हवाय, ड्रायव्हर नकोय”
“तुमच्या सर्व कुंडल्या माझ्याकडे, आम्ही मागे लागलो तर झोप लागणार नाही”