बारामती | सुप्रिया सुळेंच्या राष्ट्रीय वयोश्री योजनेच्या साहित्य वाटपाच्या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस येत्या 15 फेब्रुवारी रोजी बारामतीत येणार आहे.
राष्ट्रीय वयोश्री योजनेचे सर्वाधिक लाभार्थी बारामती लोकसभा मतदारसंघात असून ते नेत्रदीपक काम बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वाखाली झाले आहे.
ज्येष्ठ नागरिकांना मोफत कृत्रीम अवयव देण्यासाठी ही योजना सुरु करण्यात आली आहे. यात वाॅकर, काठी, तीन चाकी वाहन, दाताची कवळी, व्हिलचेअर, श्रवणयंत्र, तिपाही यांचा समावेश आहे.
दरम्यान, नुकत्याच झालेल्या शिबीरांच्या माध्यमातून बारामती लोकसभा मतदारसंघातून 11 हजार 737 लाभार्थ्यांना या साधनसामग्रीचा लाभ मिळणार आहे.
महत्वाच्या बातम्या-
-“या तारखेला मुख्यमंत्री फडणवीस विधानसभा बरखास्त करतील”
–‘हे’ तीन नवे किंगमेकर ठरवणार देशाचा नवा पंतप्रधान!
–बास झालं आता, धोनीबद्दल काही बोलाल तर खबरदार- रवी शास्त्री
-श्रेय तुम्हीच घ्या, पण एकदाचा प्रभू श्रीरामाचा वनवास संपवा- उद्धव ठाकरे
-चंद्रकांत पाटलांच्या विरोधात ‘हे’ माजी आमदार निवडणुकीच्या रिंगणात!