बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“माफी मागा अन्यथा कायदेशीर कारवाईला सामोरं जा”; राष्ट्रवादीचा भाजपला इशारा

मुंबई | राज्यात अनेक मुद्द्यांवरून राजकीय वातावरण तापलं असताना भाजपने (BJP) राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या एका भाषणाचा व्हिडीओ शेअर करत टीका केली होती. पवार नेहमीच हिंदूंचा द्वेष करतात. नास्तिक शरद पवारांनी हिंदू देवी देवतांचे बाप काढलेत, अशा शब्दात भाजपकडून टीका करण्यात आली होती.

भाजप महाराष्ट्रच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरून ही टीका करण्यात आल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) आक्रमक झालेलं पाहायला मिळत आहे. राष्ट्रवादीचे प्रवक्ते रविकांत वरपे (Ravikant Varpe) यांनी भाजपच्या टीकेवर आक्षेप घेत माफी मागा अन्यथा कारवाईला सामोरं जा, असा थेट इशारा भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकात पाटील (Chandrakant Patil) यांना दिला आहे.

अर्धवट ज्ञान असणारा भाजप पक्ष व त्यांचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे शरद पवारांबद्दल खोटी माहिती पसरवत असल्याचा आरोप देखील रविकांत वरपे यांनी केला आहे. तर भाजप आणि चंद्रकांत पाटील यांनी शरद पवारांची जाहीरपणे माफी मागावी अन्यथा कायदेशीर कारवाईला सामोरं जाण्याची तयारी ठेवावी, असा इशारा रविकांत वरपे यांनी दिला आहे.

दरम्यान, भाजपने शरद पवारांचा सातारा येथील एका भाषणाचा व्हिडीओ शेअर केला आहे. मुळात भाजपला हे भाषण समजलंच नाही, असं म्हणत रविकांत वरपे यांनी भाजपवर टीका केली आहे.

थोडक्यात बातम्या-

मुख्यमंत्र्यांच्या सभेपूर्वी मनसेची तुफान टोलेबाजी, ‘टोमणे सभा’ म्हणत शिवसेनेला पुन्हा डिवचलं

गणेश मंडळाचे अध्यक्ष ते आमदार, असा होता रमेश लटकेंचा भन्नाट राजकीय प्रवास

काय सांगता! पृथ्वीराजसाठी अक्षय कुमारने घेतले तब्बल ‘इतके’ कोटी, मानधन ऐकून थक्क व्हाल

‘मी पण अयोध्येला जाणार कारण मलाही…’; गुणरत्न सदावर्तेंचं मोठं वक्तव्य

तेल कंपन्यांकडून पेट्रोल-डिझेलचे नवे दर जारी, वाचा तुमच्या जिल्ह्यातील आजचे दर

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More