मुंबई | मराठा आरक्षणासाठी राष्ट्रवादीच्या तिसऱ्या आमदाराने राजीनामा दिला आहे. इंदापूरचे राष्ट्रवादीचे आमदार दत्तात्रय भरणे यांनी आपला राजीनामा दिला आहे.
मराठा आरक्षणासाठी मोर्चेकरी ठिकठिकाणी आक्रमक झाले आहेत. मराठा आंदोलनाला अनेक भागात हिंसक वळण लागलंय. त्यामुळे मराठा आमदारांनी राजीनाम्याचं सत्र सुरूच ठेवलंय.
दरम्यान, आतापर्यत अनेक मराठा आमदारांनी मराठा आरक्षणासाठी राजीनामे दिले आहेत. शिवसेना 1, राष्ट्रवादी 3 आणि काँग्रेसच्या एका आमदाराने राजीनामा दिला आहे. तसंच भाजपच्या 2 आमदारांनी राजीनाम्याचं पत्र मराठा मोर्चेकऱ्यांकडे दिलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या–
-पोलिसाने मोर्चेकऱ्यांना शिवीगाळ केल्याचा आरोप; सिंधुदुर्गात मराठा आंदोलन चिघळलं
-…म्हणून मराठा आमदारांनी दिलेले राजीनामे तूर्तास स्वीकारले जाणार नाहीत!
-माझ्यावर आरोप म्हणजे 6 फुटाच्या म्हशीला 16 फुटाचं रेडकू- छगन भुजबळ
-मराठा आरक्षणावरुन महापौरांसमोरील कुंडी आणि ग्लास फोडला
-कोणत्याही मराठी तरूणाने जीव गमावू नये; राज ठाकरेंची हात जोडून विनंती