बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“आता तरी मोदी देवा पावणार का? भक्तांच्या मदतीला धावणार का?”

पुणे | काही दिवसांपूर्वी पुण्यातील औंध भागात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं मंदिर बांधण्यात आलं होतं. भाजप कार्यकर्ते मयूर मुंडे यांच्या संकल्पनेतून या मंदिराची उभारणी करण्यात आली होती. या मंदिराची देशभर चर्चा झाली आहे. तब्बल दीड लाख रूपयात बांधण्यात आलेलं हे मंदिर अखेर बंद करण्यात आलं आहे. याच पार्श्वभूमीवर मोदी मंदिराबाहेर राष्ट्रवादीनं अनोखं आरती आंदोलन केलं आहे.

पेट्रोल आणि डिझेलचे भाव कमी व्हावेत म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसने मोदी मंदिरासमोर साकडं घातलं आहे. त्याचबरोबर मंदिरासमोर पेट्रोल, डिझेल, तेल आणि मसाल्यांचा नैवेद्य देखील ठेवण्यात आला. त्यासोबतच पेट्रोल, डिझेल आणि तेलाच्या बाटल्या ठेवण्यात आल्या होत्या. त्यावेळी त्यांनी मोदी मंदिरासमोर आरती देखील म्हटली. राष्ट्रवादीच्या पाठोपाठ शिवसेनेने देखील आंदोलन केलं.

‘आता तरी मोदी देवा मला पावणार का? भक्तांच्या मदतीला धावणार का? महागाई कमी करणार का, करणार का?’; अशी आरती म्हणत राष्ट्रवादीने आंदोलन केलंय. तर शिवसेना शहरप्रमुख संजय मोरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेने मोदी मंदिरासमोर आंदोलन केलं. त्यानंतर मंदिर पाहण्यासाठी औंधमध्ये सर्वांनी एकच गर्दी केल्याचं पहायला मिळालं आहे.

दरम्यान, राम मंदिराची प्रेरणा घेऊन मोदी मंदिर तयार करण्यात आल्याचं भाजप समर्थकांनी सांगितलं आहे. या मंदिराच्या उभारणीशी भाजपचा काहीही संबंध नसल्याचं पुणे भाजप शहरप्रमुख योगेश मुळीक यांनी सांगितलं आहे. तर मंदिर उभारण्यात आलेली जागा ही खासगी असल्याचं देखील समोर आलं आहे.

पाहा फोटो-

 

थोडक्यात बातम्या-

टिश्यू पेपरची किंमत चक्क कोटींमध्ये; तब्बल ‘इतक्या’ कोटीला विकला गेला ‘तो’ खास टिश्यू पेपर

पुण्याची कोरोना मुक्तीच्या दिशेने वाटचाल, वाचा पुण्याची आजची आकडेवारी!

भाजपविरूद्ध सोनिया गांधींचा मोठा प्लॅन; ‘या’ खास नेत्यांना दिलं निमंत्रण!

“आमदार गोपीचंद पडळकरांना अटक करून दाखवाच”

“देशमुखांच्या 100 कोटीत शरद पवारांच्या आणि मुख्यमंत्र्यांच्या हिस्स्याची चौकशी झाली पाहिजे”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More