बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

संजय राऊतांनंतर राष्ट्रवादीच्या रुपाली चाकणकर बेळगावात, मराठी माणसाचा प्रचार करणार!

बेळगाव | बेळगावात सध्या लोकसभा पोटनिवडणुकीच्या प्रचाराची जोरदार तयारी चालू आहे. बेळगाव लोकसभा पोटनिवडणुकीत महाराष्ट्र एकीकरण समितीने शुभम शेळके उमेदवारी दिली आहे. शुभम शेळके यांच्या प्रचारासाठी खुद्द शिवसेना नेेते संजय राऊत बेळगावात गेले आहेत. संजय राऊत बेळगावात पोहचताच बेळगावचं वातावरण तापलं आहे. तर आता बेळगावात राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांची एन्ट्री झाली आहे.

रुपाली चाकणकर बेळगावात महाराष्ट्र एकीकरण समितीचे उमेदवार शुभम शेळके यांच्या प्रचारातसाठी मैदानात उतरल्या आहेत. शुभम शेळके यांना आधी शिवसेनेने पुर्ण पाठिंबा दिला आहे. त्यानंतर आता रुपाली चाकणकर बेळगावात आल्यानं राष्ट्रवादीचा पाठिंबा देखील  शुभम शेळके यांना मिळताना दिसत आहे. या दरम्यान संजय राऊत आणि रुपाली चाकणकर यांची बेळगावात भेट झाली आहे.

संजय राऊत यांनी बेळगावात बुधवारी सभा घेतली होती. या सभेत महाराष्ट्राने मनात आणलं आणि फक्त पाणी बंद केलं तर तडफड होईल. पण आम्ही तसं करत नाही. कारण आम्ही माणुसकी बाळगतो. बेळगावमध्ये खूप वर्षांनी वाघ सिंहाचा खेळ सुरु झाला आहे. त्यामुळे इथं आता माकडांचं काम नाही, अशा शब्दात संजय राऊत यांनी भाजपवर टीका केली होती.

दरम्यान, संजय राऊत येण्याच्या आधीच संयुक्त महाराष्ट्र चौकीतील सभेसाठी महाराष्ट्र एकीकरण समितीने बांधलेले व्यासपीठ तोडलं गेलं. त्यानंतर देखील संजय राऊत यांनी सभा घेतली. त्यात त्यांनी कन्नडिगांवर जोरदार हल्ला चढवला.

थोडक्यात बातम्या-

लेडी डॉन, गर्ल्स हॉस्टेलमधून चालवायची गँग, उद्योगपतींना फोन करुन…

काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देऊन नेहरुंनी चूक केली होती- संजय राऊत

देशात कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ; गेल्या 24 तासातील आकडेवारी धडकी भरवणारी

कोरोनाबाधिताच्या संपर्कात आल्यानंतर किती वेळात कोरोना होतो?; समोर आली ही धक्कादायक माहिती

‘…तर पुण्यातील अत्यावश्यक दुकानंही बंद करा’; पुणे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More