खेळ

ऑस्ट्रेलियाकडून भारताचा दारुण पराभव; वॉर्नर-फिंचची शतकी खेळी!

मुंबई | भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताचा 10 विकेट्स राखून दारुण पराभव केला. सलामीवीर डेविड वॉर्नर आणि कर्णधार अ‌ॅरोन फिंच यांच्या शतकांच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने हा सामना सहज जिंकला. डेविड वॉर्नरने 112 चेंडूत नाबाद 128 धावा केल्या, तर अ‌ॅरोन फिंच 144 चेंडूत 110 धावा करून नाबाद राहिला.

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियामधील तीन एकदिवसीय मालिकेतील पहिला सामना मंगळवारी मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर खेळवण्यात आला. पहिल्याच सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताचा दारुण पराभव केला. या सामन्यात टॉस जिंकून ऑस्ट्रेलियाने प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला होता.

प्रथम फलदांजीला आलेल्या भारताने सर्वाबाद 255 धावा केल्या. भारताने ऑस्ट्रेलियासमोर 256 धावांचं आव्हान ठेवलं होतं. भारताचे हे आव्हान ऑस्ट्रेलियाच्या सलामीवीरांनी अवघ्या 37.4 षटकात एकही विकेट न गमावता पूर्ण केलं.

दरम्यान, भारताकडून कुलदीप यादवने 10 षटकात सर्वाधिक 55 धावा दिल्या. त्यानंतर शार्दुल ठाकूरने अवघ्या 5 षटकात 43 धावा दिल्या.

 

 

 

ठळक बातम्या-

…म्हणून उद्धव ठाकरेंची भेट न घेता अजित पवरांची भेट घेतली- शर्मिला ठाकरे

शरद पवार हे ‘जाणता राजा’च आहेत; आव्हाडांच्या वक्तव्याचं सुशीलकुमार शिंदेंकडूनही समर्थन

“…नाहीतर त्या लेखक गोयलला दाखवलं असतं राजेशाही काय असते”

महत्वाच्या बातम्या-

 

 

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या