Venkaiah Naidu
- देश

एनडीएकडून व्यंकय्या नायडू यांना उपराष्ट्रपतीपदाची उमेदवारी

नवी दिल्ली | भाजपप्रणित एनडीएकडून केंद्रीय नगरविकास मंत्री व्यंकय्या नायडू यांना उपराष्ट्रपतीपदाची उमेदवारी जाहीर करण्यात आलीय. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी त्यांच्या नावाची घोषणा केली.

 भाजपच्या संसदीय बोर्डाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. मंगळवारी ते उपराष्ट्रपतीपदाचा अर्ज दाखल करतील. 

दरम्यान, ‘यूपीए’कडून यापूर्वीच गोपाळकृष्ण गांधी यांना उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार म्हणून घोषित करण्यात आलंय. त्यांना काँग्रेससह १८ इतर पक्षांनी पाठिंबा दिला आहे. ५ ऑगस्टला ही निवडणूक होईल.

या बातमीवर तुमची कमेंट लिहा