Top News देश

“अमेरिका जगाला एकत्रही ठेवू शकला नाही, जगाचे नेतृत्व करण्यास भारत सक्षम”

नवी दिल्ली | अमेरिका आणि रशिया  दुसऱ्या महायुद्धात झालेली हानी पाहून हे देश आपल्या भूमीवर युद्ध करण्यासाठी इच्छुक नव्हते. त्यामुळे इतर देशांना त्यांनी शस्त्रसाठा पुरवून युद्ध करणं सुरू केलं. यामध्ये अमेरिका जिंकली महासत्ता झाली पण जगाला एकत्र ठेवू शकली नसल्याचं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी म्हटलं आहे.

जगातील सर्व प्रश्नांची उत्तरे भारताच्या परंपरेत आहेत. विश्वकल्याणासाठी भारताचे विचार अधिक प्रभावशाली आहेत. विविधतांना जोडणारा घटक हा फक्त भारताजवळच असून तो आम्हासा जगाला द्यायचा आहे. जगाचे नेतृत्व करण्यासाठी भारत सक्षम असल्याचं असं मोहन भागवत म्हणाले.

‘जागतिक परिप्रेक्ष्यात भारताची भूमिका’ या विषयावर ते दूरचित्रसंवाद यंत्रणेद्वारे झालेल्या कार्यक्रमात मोहन भागवत बोलत होते.

दरम्यान, इतर देश जगाला बाजार मानतात पण भारत संपूर्ण विश्वाला एक कुटुंब मानतो. ‘सर्वाना सुख मिळो’, असा भारताचा विचार आहे. यात कुणालाही लहान मानले जाणार नाही, हाच विचार भारताला द्यायचा असल्याचं भागवत यांनी सांगितलं.

महत्वाच्या बातम्या-

“शरद पवार एकवेळ कोरोनाबाबत निगेटीव्ह राहतील पण आरक्षणाबाबत पॉझिटिव्ह”

“भाजपच्या नटीने मुंबईला ‘पीओके’ म्हटले त्याच भाजपच्या मुख्यमंत्र्याला राज्याच्या विकासासाठी मुंबईत यावं लागलं”

सुपर न्यूमररी पद्धतीबाबत मुख्यमंत्री सकारात्मक- खासदार संभाजीराजे

“शरद पवारांचं नाव घेतल्याशिवाय महाराष्ट्राचा इतिहास लिहिता येणार नाही, पवार इज पॉवर”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या