बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

CBI चौकशीचं कारण देत एनडीटीव्हीच्या प्रणय रॉय यांना परदेशी जाण्यापासून अडवलं! रॉय म्हणाले…

मुंबई |  ‘एनडीटीव्ही’चे संस्थापक प्रणय रॉय आणि राधिका रॉय यांना सीबीआयच्या चौकशीचं कारण देत परदेशी जाण्यापासून अडवण्यात आलं आहे. त्यांची तपासणी करून त्यांना मुंबई विमानतळावर थांबवल्याची माहिती आहे. डॉ. प्रणव रॉय आणि त्यांच्या पत्नी राधिका रॉय यांना मुंबई विमानतळावरून ताब्यात घेतलं असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

संबंधित घडलेल्या प्रकारावर एनडीटीव्हीकडून आमच्या माध्यम स्वातंत्र्यावर सातत्याने गदा येत असल्याचा आरोप सरकारवर केला आहे.

सीबीआयने सांगितल्याप्रमाणे राधिका रॉय आणि प्रणव रॉय या दाम्पत्यांना विमान प्राधिकरण अधिकाऱ्यांनी हवाई प्रवास करण्यापासून रोखलं.

दरम्यान, सीबीआयच्या माध्यमातून सरकार माध्यमांच्या स्वातंत्र्यावर गदा आणण्याचा प्रयत्न करतंय, असं एनडीटीव्हीने म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या-

-‘शिवछत्रपतींची स्त्री निती’ पुस्तक मनसेने मुंबई महापौरांना दिलं भेट!

-सक्षणा सलगर यांचा एका वर्षाचं मानधन पूरग्रस्तांना देण्याचा निर्णय

-“भाजप सरकार डिझास्टर मॅनेजमेंट नव्हे तर डिझास्टर टुरिझम करतंय”

-संकटग्रस्तांना मदतीचा हात देण्यास ‘बारामतीकरांनी’ कधीही मागे पुढे पाहिले नाही- शरद पवार

-माजी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटलींची तब्येत बिघडली, एम्समध्ये दाखल

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More