पुणे महाराष्ट्र

भाजपने ठरवलं तर महिला मुख्यमंत्री करायला वेळ लागणार नाही- चंद्रकांत पाटील

पुणे | आम्ही सुषमा स्वराज यांना मुख्यमंत्री केलं होतं. त्यामुळे भाजपने कोणतीही गोष्ट करायची म्हटली तर तर वेळ लागणार नाही, असं भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं.

शरद पवार यांनी महाविकास आघाडी सरकारची मोट बांधली. सध्या ते आपल्या तालावर सरकारही चालवत आहेत. मग ज्यादिवशी पवारांना वाटेल तेव्हा त्यांनी सुप्रिया सुळे यांनाच मुख्यमंत्री करावं, असं वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी केलं.

हे सरकार अत्यंत गोंधळलेलं आहे. कशाचा कशाला पत्ता नाही, अशी बोचरी टीका चंद्रकांत पाटील यांनी ठाकरे सरकारवर केली आहे.

1 जानेवारीपासून शाळा सुरु करावी, म्हणजे मुलं मानसिकदृष्ट्या मोकळी होतील, असा पर्याय मी सुचवला होता. परीक्षेच्याबाबतीतही सरकारने सगळं भजं करून ठेवलं आहे, असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलंय.

महत्वाच्या बातम्या-

“जोपर्यंत वीज बिल 50 टक्के माफ होत नाही, तोपर्यंत ती भरू नका”

कॉमेडियन भारती सिंहच्या घरी NCBची धाड; भारती सिंह आणि पती हर्ष ताब्यात

“…त्यामुळे मुंबई महापालिका शिवसेनेसाठी सोडली होती”

“लस देताना सामान्य आणि व्हिआयपी असा भेदभाव नको, सर्वांचाच जीव सारखाच”

टीम इंडियात स्थान मिळालं नाही हे कळलं तेव्हा…; अखेर सुर्यकुमार यादवने सोडलं मौन

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या