बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“शरद पवार शिवसेनेचे की राष्ट्रवादी काँग्रेसचे हे तपासण्याची गरज”

मुंबई | युपीएचे अध्यक्ष पद शरद पवार यांना देण्यात यावं या संजय राऊतांच्या वक्तव्यावर नाना पटोलेंनी चांगलाच पलटवार केला आहे. शरद पवार शिवसेनेत की राष्ट्रवादीत आहेत  हे तपासण्याची गरज आहे. संजय राऊत हे शिवसेनेचे खासदार आहे हे आम्हाला माहिती आहे, असा टोला पटोलेंनी पवारांना लगावला आहे.

संजय राऊत हे शिवसेनेचे प्रवक्ते, सामना वृत्तपत्राचे संपादक आहेत हे आम्हाला माहित आहे. मात्र, अलीकडच्या काळात आम्हाला त्यांचं नवं रूप पाहायला मिळत आहे. ते म्हणजे राष्ट्रवादी प्रवक्ते किंवा शरद पवारांच्या प्रवक्त्यासारखे ते वागत आहेत. युपीएचा जे हिस्साच नाही त्यांनी अशा पद्धतीचं वक्तव्य करू नये, असं वक्तव्य करणं बरोबर नाही, असं नाना पटोले म्हणाले.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत मी या संदर्भात बोलणार आहे. जर आमच्या नेत्यांवर टीका करायची असेल तर मग आम्हालाही विचार करावा लागेल हे आम्ही त्यांना ठणकावून सांगणार आहे. आमच्यामुळे सरकार आहे हे आम्ही पहिल्या दिवशी सांगितलं आहे. ज्या पवार साहेबांची येथे तुम्ही वकिली करत आहेत ती वकिली थांबवावी, असा सल्ला नाना पटाेलेंनी राऊतांना दिला आहे.

दरम्यान, महाआघाडीची सत्ता आल्यानंतर भाजप चिडलेली मांजर बनली आहे. त्याचाच परिणाम म्हणजे जनतेच्या सर्व  प्रश्नांना दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न भाजप करत आहे. महाराष्ट्राला कसं बदनाम करता येईल असा प्रयत्न केला जात आहे. तसेच आपल्या देशात कोरोना आणण्याचं काम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला आहे, असाही आरोप पटोले यांनी यावेळी बोलताना केला आहे.

थोडक्यात बातम्या

“फुकटात मंत्रिपद मिळालेल्या आव्हाडांची उगाच वळवळ सुरूये, कोणाची एजंटगिरी करताय?”

सचिन तेंडूलकरला कोरोनाची लागण; नुकतीच खेळली होती वर्ल्ड सिरीज

टीव्हीवर सामन्याचे प्रक्षेपण दोन ते अडीच सेकंड लेट, मग बुकींनी डोंगरच गाठला थेट!

अभिनेते परेश रावल यांना कोरोनाची लागण!

‘…तर मग मोदींनी सत्याग्रह कशासाठी केला?’; ‘या’ शिवसेना खासदाराची मोदींवर बोचरी टीका

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More