महाराष्ट्र मुंबई

“नारायण राणे दु:खी आत्मा, त्यांची अवस्था विक्रम-वेताळासारखी”

मुंबई | भाजप नेते नारायण राणे यांनी दिवाळीनंतर भाजप सरकार पडणार, भाजप राज्यात दिवाळीनंतर ऑपरेशन लोटस राबवणार, असा दावा करत शिवसेनेवर निशाणा साधला होता. त्यांच्या या टीकेला शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे यांनी प्रत्युत्तर दिलंय.

नारायण राणे दुःखी आत्मा आहेत. त्यांची विक्रम-वेताळसारखी अवस्था झाली आहे, अशी बोचरी टीका शिवसेना नेत्या नील्हम गोऱ्हे यांनी केली आहे.

नारायण राणे यांनी 12 डिसेंबरपर्यंत त्या आरोपांचे पुरावे द्यावे, अन्यथा माफी मागावी, असं नीलम गोऱ्हे म्हणाल्या आहेत.

नीलम गोऱ्हे यांनी भाजप नेते किरीट सोमय्या यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर केलेल्या आरोपांवर भाष्य करत किरीट सोमय्या यांच्यावर टीकास्त्र सोडलंय. किरीट सोमय्या यांचं व्यक्तीमत्व पाहिलं तर त्यांचे विषय जेवनातल्या लोणच्याप्रमाणे आहेत. किरीट सोमय्या पांचट आहे हा वायकरांचा शब्दप्रयोग मला फार आवडला, असा टोला नीलम गोऱ्हे यांनी लगावला.

महत्वाच्या बातम्या-

“जयंतराव फुकटातलं मिळालं ते हजम करा, आमची काळजी करू नका” 

भा हा माझ्या बापाचा पक्ष, त्याचा मला अहंकार नाही तर प्रेम- पंकजा मुंडे

पवारांच्या आशीर्वादाने उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात सरकार पाच वर्षं पूर्ण करणार” 

भा नात्यात पक्ष आडवा, माजी कृषी मंत्री गहिवरले

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या