बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

नीलम गोऱ्हेंनी गुलाबराब पाटलांना सभागृहात झापलं, म्हणाल्या ‘मंत्री तुम्ही तुमच्या घरी’

मुंबई | पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी झापलं. मंत्री तुम्ही तुमच्या घरी, असं म्हणत नीलम गोऱ्हेंनी गुलाबराब पाटलांना सुनावलं आहे.

गुलाबराव पाटील मी तुम्हाला वारंवार विनंती केली, ताकीद दिली, खाली बसा आधी ताबडतोब. ही कुठली पद्धत आहे सभागृहात वागायची. संसदीय कार्यमंत्री आपण यांना समज देऊ शकत नाही? परत परत सभापती सांगतायत, ही कुठली पद्धत आहे? चौकात आहात का तुम्ही?, असं नीलम गोऱ्हे म्हणाल्यात.

दरम्यान,  उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे या गदारोळादरम्यान, संपातल्या होत्या. वारंवार विनंती करुनही आमदारांचा गदारोळ सुरुच होता.

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More