महाराष्ट्र मुंबई

“राजेंना राज्यसभेवर घेतलं पण प्रकाश आंबेडकरांना स्वीकृत नगरसेवक म्हणूनही घेणार नाही”

मुंबई | एक राजा बिनडोक आहे अशा शब्दात वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकरांनी भाजप खासदार उदयनराजे भोसलेंवर नाव न घेता टीका केली होती. यालाच प्रत्युत्तर देत भाजप नेते निलेश राणे यांनी प्रकाश आंबेडकरांवर जोरदार टीकास्त्र सोडलंय.

प्रकाश आंबेडकरांनी पुन्हा गरळ ओकली, दोन ठिकाणी लोकसभा निवडणुकीत उभे राहूनसुद्धा जेमतेम फक्त डिपॉझिट वाचू शकलं, त्यांची राजघराण्याबद्दल बोलायची इतकी लायकी नाही, असा घणाघात निलेश राणेंनी केला आहे.

राजेंना राज्यसभेवर घेतलं पण प्रकाश आंबेडकरांना कोणी स्वीकृत नगरसेवक म्हणून देखील कोणताही पक्ष घेणार नाही, असा टोला निलेश राणेंनी प्रकाश आंबेडकरांना लगावला आहे.

 

महत्वाच्या बातम्या-

“उदयनराजे बिनडोक ठरत असतील, तर निम्मा देश बिनडोक ठरेल”

नितीश कुमारांसमोर नवी डोकेदुखी, उमेदवारी न मिळालेले नेते जनशक्ती दलात

“सातारच्या गादीचा अवमान आम्ही सहन करणार नाही”

शिखर बँक घोटाळ्याप्रकरणी अजित पवारांसह 69 जणांना ‘क्लीन चिट’

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या