मुंबई | एक बेडूक आणि त्याची दोन पिल्लं शिवसेनेविरोधात ओरडत फिरत आहेत, अशी टीका मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी नाव न घेता राणे पितापुत्रांवर केली. याला निलेश राणेंनी जोरदार प्रत्युत्तर दिलंय.
उद्धव ठाकरे धमकी कोणाला देता, आम्ही चॅलेंज देतो एका दिवसासाठी विसरा तुम्ही मुख्यमंत्री आहात आणि होऊन जाऊ दे एकदा. तुमच्या धमक्यांना आम्ही फाट्यावर मारतो, असं म्हणत निलेश राणेंनी उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र सोडलं आहे.
नेहमीप्रमाणे दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरेंनी फालतू आणि पोकळ भाषण केलं. मराठा व धनगर आरक्षणाबद्दल 1 वाक्य, पण बिहारवर 20 मिनिटे, असं म्हणत निलेश राणेंनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधलाय.
नितेश राणेंनीही ट्विट करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर पलटवार केला होता. दुसऱ्यांची पिल्लं वाईट…मग त्यांनी काय DINO च्या खुशित नशा करुन मुलींवर अत्याचार करणारा “श्रावणबाळ” जन्माला घातला आहे का?, अशी टीका नितेश राणेंनी केलीये.
महत्वाच्या बातम्या-
“उद्धव ठाकरेंना सर्व आयतं मिळालं आहे… सरकार पडणार असून हे शरद पवारांनाही माहीत आहे”
फडणवीसांची मुख्यमंत्र्यांना 100 पत्र; मात्र उद्धव ठाकरेंकडून एकाचंही उत्तर नाही!
उपमुख्यमंत्री अजित पवार यांना कोरोनाची लागण!
‘मुख्यमंत्री म्हणून तुम्हाला तुमची लाज वाटायला हवी’; कंगणा राणावतचं मुख्यमंत्र्यांना प्रत्युत्तर