बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“अजित पवार साहेब तुम्ही लॉलीपॉप बनवायची फॅक्टरी टाका, शोभेल तुम्हाला”

मुंबई | स्वप्नील लोणकरच्या आत्महत्येनंतर एमपीएससीचा मुद्दा विरोधी पक्षाने जोरदार लावून धरला होता. यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एक घोषणा केली होती. 31 जुलैपर्यंत MPSC च्या सर्व रिक्त जागा भरू, असं त्यांनी म्हटलं.

आज 31 जुलै आहे. मात्र अजित पवारांनी याच दिवसात नियुक्त्या देण्याची घोषणा केली होती. यावर आता विरोधकांच्या प्रतिक्रिया येत असल्याचं पाहायला मिळत आहे. भाजप नेते निलेश राणे यांनी एमपीएससीच्या मुद्द्यावरून उपमुख्यमंत्री अजित पवारांवर निशाणा साधला आहे.

अजित पवारसाहेब तुम्ही लॉलीपॉप बनवायची फॅक्टरी टाका शोभेल तुम्हाला, अशी बोचरी टीका निलेश राणेंनी केली आहे. त्यांनी या संदर्भात एक ट्विट केलं आहे. MPSC मार्फत भरण्यात येणारी सर्व रिक्त पदे 31 जुलै पूर्वी भरण्याची घोषणा अजित पवार यांनी केली होती. आज 31जुलै आहे रिक्त पदे अद्याप भरलेली नाही. अजित पवार साहेब तुम्ही लॉलीपॉप बनवायची फॅक्टरी टाका, शोभेल तुम्हाला, असं निलेश राणेंनी म्हटलंय.

दरम्यान, अजित पवार यांनी केलेल्या या घोषणेवर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवसी यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. अजित पवार यांनी एमपीएससीबाबत केलेली घोषणा खोटी असल्याचा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी याआधी केला होता.

थोडक्यात बातम्या-

महाराष्ट्राचं टेंशन वाढलं; झिका विषाणूचा पहिला रूग्ण आढळला ‘या’ शहरात

…वेळ आली तर सेनाभवन फोडू- प्रसाद लाड

पुणे कोरोनामुक्तीच्या वाटेवर; नव्या बाधितांच्या संख्येत लक्षणीय घट

केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागल्याने नाराज असलेल्या बाबुल सुप्रियोंचा राजकारणाला अलविदा!

महाराष्ट्रात सक्रिय कोरोनाबाधितांच्या आकडेवारीत लक्षणीय घट, पाहा आकडेवारी

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More