मुंबई | एका महिलेनं उभा केलेल्या मतदारसंघात निवडून येणं यात कसला पुरुषार्थ?, असा सवाल करत जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांवर टीका केली होती.
जयंत पाटील यांनी केलेल्या या टीकेला भाजप नेते निलेश राणे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. निलेश राणे यांनी यासंदर्भात एक ट्विट केलं आहे.
पवारांची चप्पल उचलणारे चंद्रकांत पाटील यांच्यावर टीका करत आहेत. आम्हाला जयंत पाटील यांची अडचण माहित आहे. साखर कारखान्यांना फुकट पैसे मिळवण्यासाठी आणि सहकार क्षेत्रात केलेला भ्रष्टाचार लपवण्यासाठी पवारांवर प्रेम दाखवावं लागतं, असा टोला निलेश राणेंनी जयंत पाटलांनी लगावला आहे.
रविवारी शरद पवार आणि चंद्रकांत पाटील यांनी एकमेकांवर खोचक टीका केली. त्यावरून आज जयंत पाटील यांनी चंद्रकांत पाटलांवर निशाणा साधला.
ज्यांना आपलं गाव सोडून दुसरीकडे राहायला जावं लागतं, त्यांच्याबद्दल मी कशाला बोलू’, अशा शब्दात शरद पवार यांनी चंद्रकांत पाटलांना टोला लगावला होता.
पवारांची चप्पल उचलणारे चंद्रकांतदादा पाटील साहेबांवर टीका करतायत. आम्हाला जयंत पाटीलांची अडचण माहीत आहे, साखर कारखान्यांना फुकट पैसे मिळवण्यासाठी आणि सहकार शेत्रात केलेला भ्रष्टाचार लपवण्यासाठी पवारांवर प्रेम दाखवावं लागतं.
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) February 15, 2021
थोडक्यात बातम्या-
“उद्योगपती मित्रांसाठी मोदींनी देशाची संपत्ती विकायला काढली”
शरद पवारांच्या आदेशानंतर ‘या’ आमदाराची पक्षातून हकालपट्टी!
“तेंडुलकर आणि लतादीदींच्या चौकशीचा प्रश्नच उद्भवत नाही, लता मंगेशकर आमचं दैवत”
राज्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत कमालीची वाढ; गेल्या 24 तासांत ‘इतक्या’ हजार रूग्णांची नोंद