महाराष्ट्र मुंबई

निलेश राणेंचं आक्षेपार्ह ट्विट; महाविकास आघाडीतील पक्षांना दिली ‘ही’ शिवी!

मुंबई | राज्यातील पदवीधर आणि शिक्षक मतदार संघाची निवडणुक पार पडली. यात महाविकास आघाडीने दणदणीत विजय मिळवला आहे. तर भाजपला हार पत्करावी लागली आहे. यानंतर महाविकास आघाडीतील नेते आणि भाजप यांच्यात चांगलीच जुंपली आहे.

पदवीधर आणि शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीच्या निकालावरून भाजप नेते निलेश राणे यांनी आक्षेपार्ह ट्विट करत महाविकास आघाडी सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडलं आहे.

3 भाडखाऊ पक्ष एकत्र येऊन 2-3 सीट जिंकले म्हणजे त्यांना वाटलं त्यांनी मोठा पराक्रम केला. सोयीची आघाडी एखाद दुसरी निवडणूक जिंकून देईल पण तो विजय ज्यास्त वेळ टिकत नाही, अशी टीका निलेश राणे यांनी केली आहे.

3 पक्ष एकटे लढले असते तर त्यांची काय अवस्था झाली असती हे वेगळं सांगायला नको म्हणून त्यांनी उड्या मारायची गरज नाही, असा टोला निलेश राणेंनी लगावला आहे.

 

 

 

महत्वाच्या बातम्या-

“तारक मेहता का उल्टा चष्मा” मालिकेतील महत्त्वाच्या व्यक्तीनं केली आत्महत्या!

आजपासून नेटफ्लिक्सवर फुकट पाहता येणार वेबसीरिज; पाहा कसं कराल सुरु!

नशिबाने थट्टाच मांडली होती, मात्र शेवटच्या षटकांमध्ये जडेजा नावाचं वादळ आलं अन्…

शेतकरी आंदोलनावर अखेर सोनू सूदही बोलला पण जरा जपूनच!

मुंबईकरांसाठी गुडन्यूज; आदित्य ठाकरे यांनी केली मोठी घोषणा!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या