“किमान राजघराण्यातील व्यक्तींनी संज्यासारख्या फडतूस माणसाला…”
मुंबई | भाजप नेते नीलेश राणे यांनी पुन्हा एकदा शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांच्यावर टीकास्त्र सोडलं आहे. निलेश राणेंनी संजय राऊतांच्या कोल्हापूरमधील पत्रकार परिषदेनंतर लगेच ट्विटरवरुन निशाणा साधला.
या ट्विटमध्ये संजय राऊत यांचा एकेरी उल्लेख करतानाच छत्रपतींच्या घराण्याला एकमत दाखवण्याचा सल्ला नीलेश राणेंनी दिलाय.
किमान राजघराण्यातील व्यक्तींनी संजय राऊतांसारख्या फडतूस माणसाला बोलण्याची संधी देऊ नये. तुम्हीच एकमत दाखवलं नाही तर समाज तुमच्याकडून काय बोध घेईल? परत परत बोलून लाथ मारलेल्या खासदारकीला आपण महत्त्व देताय, असं नीलेश राणे म्हणाले.
दरम्यान, संजय राऊत यांनी कोल्हापूरचा दौरा केला. या दौऱ्यादरम्यान त्यांनी श्रीमंत शाहू महाराज यांची भेट घेऊन या विषयावर चर्चा केली. त्यानंतर राऊत यांनी पत्रकार परिषदेमध्ये आपली भूमिका स्पष्ट करतानाच विरोधकांवर निशाणा साधला. मात्र या प्रकरणावरुन श्रीमंत शाहू महाराज आणि संभाजीराजे यांच्या वक्तव्यांमधील विरोधाभास दिसून आला. यानंतर नीलेश राणेंनी टविट करत या प्रकरणावरून राऊतांवर टीका केलीये.
थोडक्यात बातम्या-
“नितीन गडकरी पंतप्रधान झाले असते तर रोजी रोटीचा प्रश्न मिटला असता”
मोठी बातमी! अखेर सिद्धू मूसेवाला याच्या हत्येचं कारण आलं समोर
महाविकास आघाडी सरकार अडचणीत?; काँग्रेसमुळे टेंशन वाढलं
“केंद्रीय तपास यंत्रणांच्या कारवाईची माहिती भाजपवाल्यांना कशी मिळते?”, सुप्रिया सुळेंचा खोचक सवाल
मोठी बातमी! भाजपकडून राज्यसभा उमेदवारांची नावे जाहीर
Comments are closed.