बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“संज्या ते पवार कुटुंब आहे, शुभेच्छा ही देतील आणि पाठीमागे तिरडी सुद्धा बांधतील”

मुंबई | शिवसेना नेते संजय राऊत यांनी दैनिक सामनातील रोखठोक सदरातून भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडलं आहे. चंद्रकांत पाटलांनी आम्हाला पत्रं लिहिलं, त्यामुळे त्यांचंच धोतर सुटलंय, असं सांगतानाच महाराष्ट्रातील विरोधकांनी हास्यजत्रा करून ठेवली आहे. किती मनोरंजन कराल?, असा सवाल संजय राऊत यांनी केला आहे.

पाटील म्हणतात की देवेंद्र फडणवीस शंभर अजित पवार खिशात घेवून फिरतात. पहाटेच्या शपथविधीनंतर एकमेव अजित पवार 72 तासांत भाजपच्या खिशातून सटकले. 100 अजित पवार भाजपला कसे झेपणार?, अशी टीका राऊतांनी केली. त्यांच्या या टीकेला भाजप नेते निलेश राणे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.

संज्या पवार कुटुंबाची किती चाटूगिरी करणार, जिभेला आराम दे. चंद्रकांतदादांनी अजित पवारांबद्दल केलेलं वक्तव्य इतकं झोबलं की दोन दिवस संज्या त्यावरच बोलतोय, असं प्रत्युत्तर निलेश राणेंनी दिलं आहे.

संज्या ते पवार कुटुंब आहे, वाढदिवसाच्या शुभेच्छा ही देतील आणि पाठीमागे तिरडी सुद्धा बांधतील, असं म्हणत निलेश राणेंनी संजय राऊतांसह पवार कुटुंबावर देखील निशाणा साधला आहे. तसेच संज्याला उगाच माजी संपादक नाही करून टाकला. खातो सनेचं आणि काम करतो राष्ट्रवादीचं, अशी टीका निलेश राणेंनी केलीये.

 

 

थोडक्यात बातम्या- 

“हॅरीस अमेरिकेच्या उपराष्ट्रपती बनू शकतात मग सोनिया गांधी पंतप्रधान का बनू शकत नाहीत?”

भारतातील सशक्त लोकाशाहीमुळे एक चहा विकणारा चौथ्यांदा आमसभेत भाषण देतोय- नरेंद्र मोदी

“72 तासांत खिशातून सटकलेले अजित पवार भाजपला कसे झेपणार?”

पुढील तीन-चार दिवस राज्यातील ‘या’ भागात मुसळधार पावसाची शक्यता!

‘कोरोना लसीचा दुसरा डोस घ्यायचा विसरला असला तर…’, आरोग्य तज्ज्ञांनी दिली महत्वाची माहिती

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More