महाराष्ट्र मुंबई

“… हे स्टार प्रचारक बिहारमध्ये जाऊन उरलीसुरली स्वतःची अब्रू घालवणार”

मुंबई | बिहार विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेनेने 20 जणांच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली आहे. या यादीत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे, शिवसेना खासदार संजय राऊत यांचा समावेश आहे.

शिवसेनेनं जाहीर केलेल्या स्टार प्रचारकांच्या यादीवरून भाजप नेते माजी खासदार निलेश राणे यांनी शिवसेनेवर जोरदार टीका केली आहे. त्यांनी या संदर्भात ट्विट केलंय.

या स्टार कॅम्पेनर्सना महाराष्ट्रात कुत्र भीक घालत नाही आणि बिहारमध्ये जाऊन उरलीसुरली स्वतःची अब्रू घालवणार. महाराष्ट्र सोडून ज्या ज्या राज्यात शिवसेनेने उमेदवार उभे केले त्या राज्यांमध्ये शिवसेनेच्या उमेदवारांचे डिपॉझिटदेखील वाचले नाही हा इतिहास आहे, असं निलेश राणे म्हणालेत.

 महत्वाच्या बातम्या-

काँग्रेसने रावसाहेब दानवेंना दिली ‘या’ व्हिलनची उपमा

हाथरससारख्या गंभीर घटनेचा लोक स्वार्थासाठी, खुर्चीसाठी, राजकारणासाठी वापर करत आहेत- तनुश्री दत्ता

मास्कच्या किमतींवर नियंत्रण, अवघ्या 3 ते 4 रुपयात मिळणार मास्क- राजेश टोपे

प्रसिद्ध टिकटॉक स्टार प्रतिक खत्रीचा मृत्यू

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या