मुंबई | पुणे असं आहे की इथं प्रत्येकाला सेटल व्हावं वाटतं. पण मी कोल्हापूरला परत जाणार आहे. विशेष करून मला विरोधकांना ही गोष्ट सांगायची आहे, असं भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं. यावरून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी चंद्रकांत पाटलांना टोला लगावला.
सरकार नाही त्यामुळे ते अस्वस्थ झाले आहेत. तसेच परत जाईन म्हणायला त्यांना कोणी पुणेकरांनी बोलावलंही नव्हतं, असं अजित पवार म्हणाले. अजित पवारांच्या या टीकेला भाजप नेते निलेश राणे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
धरणवीर उपमुख्यमंत्री जास्तचं बोलू लागले आहेत. स्वतःच्या मागे एक आमदार नाही, फक्त नशिबाने पद मिळालं ते सांभाळा नीट. बोलीचा भात आणि बोलाचीच कढी, फालतू टिपण्या देण्यापेक्षा महाराष्ट्राच्या हिताचे कार्यक्रम राबवा, अशी टीका निलेश राणे यांनी केली आहे.
मराठा समाज तडफडतोय त्यांच्या आरक्षणासाठी पुढाकार घ्या हिंमत असेल तर, असं म्हणत निलेश राणे यांनी अजित पवारांनाच ललकारलं आहे.
धरणवीर उपमुख्यमंत्री ज्यास्तच बोलू लागले आहेत. स्वतःच्या मागे एक आमदार नाही, फक्त नशिबाने पद मिळालं ते सांभाळा नीट. बोलीचा भात आणि बोलाचीच कढी, फालतू टिपण्या देण्यापेक्षा महाराष्ट्राच्या हिताचे कार्यक्रम राबवा. मराठा समाज तडफडतोय त्यांच्या आरक्षणासाठी पुढाकार घ्या हिम्मत असेल तर.
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) December 26, 2020
थोडक्यात बातम्या-
“सरकारकडे विकासासाठी पैसा नाही पण निवडणुका जिंकण्यासाठी, सरकारे पाडण्या-बनवण्यासाठी पैसे आहे”
मुंबईतील फिनिक्स मॉलमध्ये भीषण आग, अग्निशमन दलाच्या 8 गाड्या घटनास्थळी दाखल
राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्याची प्रकाश आंबेडकरांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट!
…तर त्यांना 10 फूट खोल खड्यात पुरलं जाईल- शिवराज सिंह चौहान
काँग्रेसला मोठा झटका; ‘या’ बड्या नेत्याची काँग्रेसला सोडचिठ्ठी