बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘अशोक चव्हाण साधे केळी विकायच्या लायकीचे नाहीत’; ‘या’ भाजप नेत्याची बोचरी टीका

मुंबई | मराठा समाजाला आरक्षण देण्याचा राज्य सरकारचा निर्णय सर्वोच्च न्यायालयानं रद्द केला आहे. यामुळे मराठा समाजातून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. तसेच मराठा आरक्षण रद्द झाल्यानंतर आता राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडी आणि विरोधी पक्षातील भाजपच्या नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपांचं सत्र सुरू झालं आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावरून भाजप नेते निलेश राणे यांनी मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांच्यावर सडकून टीका केली आहे. निलेश राणे यांनी या संदर्भात एक ट्विट केलं आहे.

ठाकरे सरकारने मराठा आरक्षणाचे सगळ्या बाजूने तीन तेरा वाजवले. अशोक चव्हाण साधे केळी विकायच्या लायकीचे नाहीत, असा घणाघात निलेश राणे यांनी केला आहे.

दरम्यान, बंगालच्या निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा अदृश्य हात असल्याने ममता बॅनर्जी यांचा विजय झाल्याचं बोललं जात आहे. मात्र, मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी कधी पवार साहेबांचे अदृश्य हात जाणवले नाहीत उलट मराठा आरक्षण विरोधी त्यांनी भूमिका घेतली, असा आरोप निलेश राणेंनी केला आहे.

थोडक्यात बातम्या- 

“सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निर्णय हे सरकारचं अपयश, उद्धव ठाकरेंनी राजीनामा द्यावा”

“राजेश टोपे जालन्याचे आरोग्यमंत्री आहेत की महाराष्ट्राचे?”

माझ्यासाठी आणि समाजासाठी अतिशय दुर्दैवी आणि अतिशय भयानक क्षण- विनोद पाटील

“सर्वोच्च न्यायालयाने मराठा बांधवांना जे नाकारलं, त्याची भरपाई राज्य सरकार करुन देणार”

…म्हणून सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाचा कायदा रद्द केला- अशोक चव्हाण

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More