“अडचणीचे ढग दिसले की अजित पवार मिस्टर इंडियासारखे गायब होतात”
मुंबई | अडचणीचे ढग दिसले की अजित पवार मिस्टर इंडियासारखे गायब होतात असा टोला भाजप नेते आणि माजी खासदार निलेश राणे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांना लगावला. त्यांनी या संदर्भात एक ट्विट केलं आहे.
अडचणीचे ढग दिसले की अजित पवार मिस्टर इंडियासारखे गायब होतात. इतिहास सांगतो जेव्हा असामान्य परिस्थिती निर्माण होते तेव्हा अजित पवार गुल. पण बरं झालं अजित पवार यात पडले नाहीत, असं निलेश राणे म्हणालेत.
पहाटेच्या शपथविधीला त्यांच्यासोबत त्यांच्याच पक्षातले आमदार राहिले नाही ते बाहेरून आमदार कुठून आणणार, असंही निलेश राणेंनी म्हटलं आहे.
दरम्यान, निलेश राणे यांच्या ट्विटवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा विद्या चव्हाण यांनी उत्तर दिलं आहे. निलेश राणे कोण आहेत? त्यांना आम्ही ओळखत नाही. अजित पवार दिवसरात्र काम करणारे नेते आहेत, असं विद्या चव्हाण यांनी म्हटलं आहे.
थोडक्यात बातम्या-
Siddhant Kapoor | मोठी बातमी! अभिनेत्री श्रद्धा कपूरचा भाऊ ड्रग्ज घेताना सापडला
महाविकास आघाडीचं टेंशन वाढलं?; ‘या’ भाजप नेत्याचा खळबळजनक दावा
पुण्यात कोरोनाने पुन्हा डोकं वर काढलं; आरोग्य विभागाने घेतला ‘हा’ निर्णय
“…तर देवेंद्र फडणवीसही शिवसेनेला मतदान करतील”
“एकवेळ समुद्राची खोली मोजता येईल पण शरद पवारांच्या…”
Comments are closed.